शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

By अजित मांडके | Updated: November 7, 2022 23:13 IST

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी विवीयना मॉल मध्ये जाऊन हा शो पुन्हा सूरू करण्याची मागणी केली आहे

ठाणे - हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने दाखवलेले आहे, त्याला विरोध करत आज रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल उपस्थित केल्यानंतर संत तू झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यावरुन, आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाण्यात रंगला आहे. मनसेनं रात्री उशिरा हा चित्रपट सुरू करण्याची मागणी केली आहे.

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी विवीयना मॉल मध्ये जाऊन हा शो पुन्हा सूरू करण्याची मागणी केली आहे. प्रेक्षकांना मारहाण करणे चुकीचे असून मारहाण करण्याऱ्याला अटक करुन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच शो बघूनच येथून जाणार, कोणाला यायचे त्याने यावे आणि शो बंद करून दाखवावा, असा इशाराच एकप्रकारे त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.    काही काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात परदर्शित झालेला आहे मात्र या चित्रपटाला आता विरोध सुरू झालेला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दहा वाजता विवियाना मॉल येथे जाऊन आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका प्रेक्षकांने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या या दर्शकाने त्यांचं ऐकलं नाही. अखेर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर, या चित्रपटगृहातील नाट्यात मनसेची एंट्री झाली असून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट दाखवल्या जात असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली विकृत परंपरा आता चित्रपटांच्या माध्यमातून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र ही विकृती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बाजीप्रभू देशपांडे हा छत्रपती शिवाजी महाराजांची लढताना दाखवलेला आहे हा चुकीचा इतिहास दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAvinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेcinemaसिनेमा