mns agitation near thane toll plaza | टोलमुक्तीसाठी मनसेचं ठाण्यात आंदोलन
टोलमुक्तीसाठी मनसेचं ठाण्यात आंदोलन

ठाणे : मनसेने MH 04 टोलमुक्त करण्यासाठी आज आनंदनगर टोलनाका येथे धरणे आंदोलन केले. याआधी मानवी साखळी करून टोलमुक्त करण्याची मागणी मनसेने केली होती. आज आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. ठाणेकरांना लवकरच टोलमुक्ती न मिळाल्यास तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. शिवसेनेने टोलमुक्तीचे आश्वासन दिले. मात्र अद्याप ते पूर्ण केले नसल्याचा आरोप यावेळी मनसेने केला. शहर खड्डयात गेले असताना कसली टोलवसुली करताय, असा सवाल ही यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.

Web Title: mns agitation near thane toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.