टोलमुक्तीसाठी मनसेचं ठाण्यात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 14:57 IST2019-12-03T14:50:07+5:302019-12-03T14:57:08+5:30
टोलमुक्ती न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

टोलमुक्तीसाठी मनसेचं ठाण्यात आंदोलन
ठाणे : मनसेने MH 04 टोलमुक्त करण्यासाठी आज आनंदनगर टोलनाका येथे धरणे आंदोलन केले. याआधी मानवी साखळी करून टोलमुक्त करण्याची मागणी मनसेने केली होती. आज आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. ठाणेकरांना लवकरच टोलमुक्ती न मिळाल्यास तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. शिवसेनेने टोलमुक्तीचे आश्वासन दिले. मात्र अद्याप ते पूर्ण केले नसल्याचा आरोप यावेळी मनसेने केला. शहर खड्डयात गेले असताना कसली टोलवसुली करताय, असा सवाल ही यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.