शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

बालकांसाठीचा कोरोना वॉर्ड बांधकाम विभागामुळे रखडल्याने आमदार संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 17:59 IST

Miraroad News : लहान मुलांसाठी कोरोना उपचार वॉर्ड सुरु करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र लहान मुलांसाठीच वॉर्ड सुरूच झाला नाही.

मीरारोड - पालकमंत्री एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात आले असता त्यावेळी महापालिकेने लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड सुरू केल्याचा गाजावाजा केला होता. परंतु पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने किरकोळ कामांसाठी दिरंगाई केल्याने बालकांसाठी वॉर्ड सुरु न झाल्याने आमदार गीता जैन या अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापलेल्या दिसून आल्या. भाईंदर पश्चिमेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार केले जातात.  त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आल्यावर त्याचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात झाले होते. त्यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट आणि लहान बालकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका पाहता जोशी रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरु केल्याचा गवगवा महापालिकेने त्यावेळी केला होता. 

डॉ . नरेश गीते आयुक्त असताना त्यांनी लहान बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र सुरु केले होते. त्याच ठिकाणी आता हा लहान मुलांसाठी कोरोना उपचार वॉर्ड सुरु करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र लहान मुलांसाठीच वॉर्ड सुरूच झाला नाही. दरम्यान कोरोनाचे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण शहरात आढळून आले असताना त्यांना सामान्य वॉर्ड मध्येच ठेवण्यात आले. हा प्रकार गीता जैन यांना समजला असता त्यांनी वैद्यकीय समितीचे सदस्य माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवालसह जोशी रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी लहान मुलांचा वॉर्ड सुरु झाला नसल्याचे आढळले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लहान मुलांच्या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्र, मुलांसाठी वॉश बेसिन आदी सुविधा बांधकाम विभागाने करून दिल्या नसल्याने मुलांसाठी वॉर्ड सुरू केला गेला नसल्याचे गीता यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आमदार गीता जैन संतापल्या व त्यांनी कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व उपअभियंता नितीन मुकणे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत कामे वेळेत पूर्ण होत नसल्याबद्दल त्यांची कानउघाडणी केली. मुकणे स्वतः जोशी रुग्णालयात आले. त्यावेळी आवश्यक आमी दोन दिवसांत पूर्ण करून देऊ असे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याmira roadमीरा रोड