सरनाईकांचे "प्रताप" उघडकीस, विहंग गार्डन इमारत अनधिकृत; कारवाईची किरीट सोमय्या यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 14:10 IST2020-12-16T14:10:19+5:302020-12-16T14:10:29+5:30
Pratap Sarnaik News : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची विहंग गार्डन इमारत अनधिकृत असल्याची भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे.

सरनाईकांचे "प्रताप" उघडकीस, विहंग गार्डन इमारत अनधिकृत; कारवाईची किरीट सोमय्या यांची मागणी
ठाणे - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची विहंग गार्डन इमारत अनधिकृत असल्याची भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. गोरगरीब नागरिकांची प्रताप सरनाईक यांनी फसवणूक केली असून याबाबत शुक्रवारी किरीट सोमय्या वर्तक नगर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. बुधवारी भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर प्रकरणात घोटाळा झाला असल्याचे सांगितले.
ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली असा आरोप सोमय्या यांनी केला. 2008 साली ठामपा ने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडक कारवाईचे आदेश दिले परंतु आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त जात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली.त्याच अनुशंगाने येत्या शुक्रवारी सोमया ठाण्यातील वर्तक नगर पोलिस स्टेशनला सरनाईक विरोधात फ़ौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या सारख्या गुन्हेगारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सौरक्षण देत आहेत का ? तसेच ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना उद्धव ठाकरे यांना हे प्रकरण माहीत नाही का ? असा सवाल यावेळी किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला असून या संबंधात ठाणे पालिकेचे अधिकारी यांच्याशी बोलले झाले आहे .दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.