शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

By नितीन पंडित | Updated: July 13, 2023 19:55 IST

या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

भिवंडी : भाजप प्रदेश कार्यकारिणीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर गुरुवारी भिवंडीत पार पडले. या शिबिरात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री आमदार खासदार व नेते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या शिबिरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हजेरी लावली. त्यानंतर फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी फडणवीस यांच्या सभेसाठी नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे व आमदार प्रवीण दरेकर हे हॉटेलच्या लिफ्टमधून पहिल्या मजल्यावर चालले होते, मात्र अचानक लिफ्ट मध्ये बिघाड झाल्याने आमदार मंदा म्हात्रेप्रवीण दरेकर हे दोघेही त्यांच्या सहकाऱ्यांसह सुमारे पंधरा मिनिटे लिफ्टमध्येच अडकले होते. ही लिफ्ट कोपऱ्यात असल्याने सुरुवातीला लिफ्ट अडकल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही, त्यातच या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने म्हात्रे व दरेकर यांना मोठा संताप झाला.

अखेर १० ते १५ मिनिटानंतर लिफ्ट सुरू करून म्हात्रे व दरेकर यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. लिफ्टमधून सुखरूप बाहेर आल्याने मंदा म्हात्रे व दरेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यांनतर म्हात्रे या कार्यक्रमा ठिकानी पहिल्या मजल्यावर जिना चढूनच गेल्या.

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरManda Mhatreमंदा म्हात्रेLiftmanलिफ्टमनbhiwandiभिवंडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा