शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

ठाण्यातून बेपत्ता तरुणीचा पुण्यात लागला छडा

By जितेंद्र कालेकर | Published: December 08, 2020 11:14 PM

ठाण्यातून अचानक बेपत्ता झालेल्या एका उच्चशिक्षित २२ वर्षीय तरुणीचा पुण्यातून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. आपली मुलगी सुखरुप मिळाल्याने कुटूंबियांनी नौपाडा पोलिसांचे आभार मानले.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कामगिरीलग्नाच्या दबावामुळे सोडले घर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातून बेपत्ता झालेल्या एका २२ वर्षीय तरुणीचा पुण्यातून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. लग्नासाठी कुटूंबीयांनी दबाव आणल्यामुळे आपण घर सोडल्याचे चौकशीमध्ये तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या सीटी स्कॅन विभागामध्ये शिक्षण घेणारी ही तरुणी ठाण्याच्या चरईमध्ये वास्तव्याला आहे. ती २ डिसेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी तिच्या कुटूंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार महेंद्र घोसाळकर आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर काळे यांच्या पथकाने या तरुणीचा ती शिक्षण घेत असलेल्या मुंबईतील रुग्णालयात शोध घेतला. तेंव्हा तिच्या एका मित्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या तरुणीला नौपाडा पोलिसांच्या या पथकाने पुण्यातील शिवाजीनगर येथील एका हॉटेलमधून तिचा शोध घेतला. तिच्याच मित्राच्या मदतीने तिला विश्वासात घेऊन तिला ताब्यात घेतले. करियर करण्याची इच्छा असतांनाही कुटूंबियांनी लग्नासाठी दबाव आणल्यामुळे आपण घर सोडल्याची कबूली तिने पोलिसांना दिली. तिला ५ आॅक्टोंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कुटूंबियांच्या सुखरुपपणे स्वाधीन करण्यात आले. आपली मुलगी सुखरुप मिळाल्याने कुटूंबियांनी नौपाडा पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं