Mira Road: काशीमीराच्या बार मध्ये मेमसाबचे अश्लील नृत्य
By धीरज परब | Updated: March 1, 2023 22:29 IST2023-03-01T22:28:56+5:302023-03-01T22:29:50+5:30
Mira Road: काशीमीराच्या पेणकरपाडा भागात असलेल्या मेमसाब ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिला गायिकांच्या नावाखाली बारबाला अश्लील नाच करत असल्या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

Mira Road: काशीमीराच्या बार मध्ये मेमसाबचे अश्लील नृत्य
मीरारोड - काशीमीराच्या पेणकरपाडा भागात असलेल्या मेमसाब ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिला गायिकांच्या नावाखाली बारबाला अश्लील नाच करत असल्या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
सदर बार मध्ये महिला गायिकांच्या आड बारबाला ह्यांना अश्लील नाच करायला लावला जातो अशी माहिती अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना मिळाली . त्या बाबतची चित्रफीत त्यांना मिळाल्यावर अहिरराव यांनी उमेश पाटील, विजय निलंगे, केशव शिंदे, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे, सोनाली मोरे अश्या पोलीस पथकासह बार वर धाड टाकली.
हिंदी गाणी व वाद्याच्या तालावर बारबाला अश्लिल नृत्य करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बारचे कर्मचारी हे त्या बारबालांना अश्लिल नृत्य करण्यास भाग पाडुन प्रोत्साहित करीत असताना सापडले . या प्रकरणी रोख रक्कम व चित्रीकरण केलेली क्लीप जप्त करून बारचा मालक, चालक, व्यवस्थापक, पुरुष गायक , वादक व वेटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .