Mira Road: वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन दलाल महिलांवर गुन्हा दाखल   

By धीरज परब | Published: November 24, 2023 06:57 PM2023-11-24T18:57:43+5:302023-11-24T18:57:59+5:30

Crime News: व्हॉट्स एप वर तरुणींचे फोटो पाठवून नंतर मीरा भाईंदर मधील लॉज बुक करायला लावून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या दोन महिला दलालांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Mira Road: A case has been registered against two broker women running prostitution business | Mira Road: वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन दलाल महिलांवर गुन्हा दाखल   

Mira Road: वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन दलाल महिलांवर गुन्हा दाखल   

मीरारोड - व्हॉट्स एप वर तरुणींचे फोटो पाठवून नंतर मीरा भाईंदर मधील लॉज बुक करायला लावून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या दोन महिला दलालांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एकीला पोलिसांनी काढले असून फरार महिलेचा शोध सुरु आहे .

मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष चे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना महिला वेश्या दलाल बाबत माहिती मिळाल्या नंतर बोगस गिऱ्हाईक द्वारे तिच्याशी संपर्क केला . तिने वेश्या व्यवसायासाठी दोन तरुणीना भाईंदरच्या मॅक्सस मॉल जवळ  आणले . १० हजार रुपयांचा सौदा निश्चित होऊन तिने पैसे स्वीकारल्यावर सापळा रचून असलेले अहिरराव सह उमेश पाटील , शिवाजी पाटील , रामचंद्र पाटील , चेतनसिंग राजपूत , केशव शिंदे , सम्राट गावडे , शीतल जाधव , अश्विनी वाघमारे यांच्या पथकाने छापा टाकून महिला दलाल व दोन्ही तरुणींना ताब्यात घेत चौकशी केली . 

दलाल आरोपी महिलेचे नाव शबनम बेगम शहजादा खान ( २३ ) असून ती नालासोपारा पूर्वेच्या रेहमत नगर भागातली आहे . तिला अटक करून तिच्यासह दलाल साथीदार अलिशा खान वर भाईंदर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शबनम ने वेश्या व्यवसाय साठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे . 

Web Title: Mira Road: A case has been registered against two broker women running prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.