लोकमत न्यूज नेटवर्क, मिरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शुक्रवारी अर्ज माघारीनंतर ४३५ उमेदवार रिंगणात आहेत. यातील अपक्ष उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत तिकीट न मिळालेले अनेक माजी नगरसेवक अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. अनेक नाराजांनी आपले अपक्षांचेही पॅनल तयार करून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, वेगवेगळी चिन्हे मिळाल्याने पॅनल करून लढणाऱ्या अपक्षांची अडचण झाली आहे.
अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या उमेदवारांना निवडणुकीचे मिळाल्यावर प्रचार सुरू करता येतो.. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी चिन्ह कार्यालयात निवडणूक चिन्ह मिळण्यासाठी अपक्षांमध्ये उत्सुकता होती. यंदा मीरा-भाईंदर पालिकेसाठी झाली असून, या बंडखोर माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी काही ठिकाणी अपक्षांचे पॅनल केले आहे. त्यामुळे आज सहकारी उमेदवारांना सारखीच चिन्हे मिळावीत, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु, वेगवेगळी चिन्हे मिळाल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.
भाजपतील माजी नगरसेवक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या प्रभाग २३ चे विनोद म्हात्रे यांना नगारा तर प्रभाग ६ मधून शुभांगी कोटियान यांना नारळ चिन्ह मिळाले आहे. प्रभाग १ मधील रिटा शाह यांना नगारा, भेरुलाल जैन यांना एअर कंडिशन तर प्रभाग ७ च्या रक्षा भूपताणी यांना कपाट चिन्ह मिळाले आहे. डॉ. प्रीती पाटील यांना प्रभाग ५ मध्ये स्टेथोस्कोप तर प्रभाग. ४ मधील प्रभात पाटील यांना पुस्तक, गणेश भोईर यांना चावी व पियुष पाटील यांना चष्मा अशी वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत.
'ते' चिन्ह अनेकांच्या ओळखीचे
त्यातही अनेकांना बॅट चिन्ह मिळाल्याने ते खुश आहेत. कारण मागील दोन विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार गीता जैन यांनी अपक्ष म्हणून बॅट चिन्हावर निवडणूक लढवल्याने ते चिन्ह लोकांना परिचित होते.
कोणाला ट्रक, रिक्षा
प्रभाग २ मध्ये देखील मीना कांगणे यांना डिश अँटेना, यशवंत कांगणे यांना बॅट भाटेवाडा अभिषेक यांना शटल तर शिखा यांना टेनिस रॅकेट मिळाले आहे. प्रभाग १४ मध्ये अनिल भोसले यांना रिक्षा आणि सहकारी कविता भोये यांना कपाट मिळाले. प्रभाग १८ चे दौलत गजरे यांना बुद्धिबळ तर वैशाली वाडीले यांना रिक्षा आणि इम्रान हाश्मी यांना ट्रक अशी आगळीवेगळी निवडणूक चिन्हे मिळाल्याने प्रचारात रंगत येणार आहे.
माजी आमदारांची 'बॅट' मिळताच अनेकजण खूश
शिंदेसेनेचे बंडखोर प्रभाग १७ चे नारायण नांबियार यांना तसेच प्रभागामध्ये प्रीती शर्मा यांना बॅट चिन्ह मिळाले आहे. ह्यांनी पूर्वी गीता जैन यांच्यासाठी बॅट चिन्हाचा प्रचार केला असल्याने अपेक्षित चिन्ह मिळाल्याने खुश झाले आहेत. प्रभाग ८ मधील काँग्रेसचे बंडखोर प्रकाश नागणे यांना देखील बॅट चिन्ह मिळाले आहे.
Web Summary : Mira-Bhayandar municipal elections see independent candidates, including ex-corporators, forming panels. Diverse election symbols assigned caused confusion among panel members. Many received unexpected symbols, while some were happy to get the 'Bat', a familiar symbol due to past elections.
Web Summary : मीरा-भायंदर नगर निगम चुनावों में निर्दलीय उम्मीदवार, जिनमें पूर्व पार्षद भी शामिल हैं, पैनल बना रहे हैं। विभिन्न चुनाव चिन्ह आवंटित होने से पैनल सदस्यों में भ्रम है। कई को अप्रत्याशित प्रतीक मिले, जबकि कुछ 'बैट' पाकर खुश थे, जो पिछले चुनावों के कारण एक परिचित प्रतीक है।