शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकाचा मृत्यू तर उपायुक्तांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 8:29 PM

महापालिका मुख्यालयात काम करणारे आरोग्य विभागाचे लिपिक रामकृष्ण गावडे यांचे आज बुधवारी कोरोना मुळे निधन झाले .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकाचा कोरोना मुळे आज बुधवारी मृत्यू झाला असून उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे . कोरोनाने पालिकेत शिरकाव केल्याने आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आज दिवसभरासाठी  स्वतःला  अलगीकरण केले . 

महापालिका मुख्यालयात काम करणारे आरोग्य विभागाचे लिपिक रामकृष्ण गावडे यांचे आज बुधवारी कोरोना मुळे निधन झाले . त्यांना गेल्या आठ दिवसां पासून भक्तिवेदांतच्या पी व्ही जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते . 

उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांचा कोरोना चाचणी अहवाल काल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला अलगीकरण करून घेतले आहे . मंगळवारी सकाळी पानपट्टे कार्यालयात आले होते . त्यांचा वाढदिवस होता . पण दुपारी अहवाल आल्याने ते निघून गेले . 

पानपट्टे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर आयुक्त डॉ . राठोड यांनी स्वतःला अलगीकरण करून घेतले आहे . त्यांची चाचणी करण्यात येऊन अहवाल निगेटिव्ह आल्यास ते पुन्हा कामावर रुजू होतील असे सूत्रांनी सांगितले. परंतु जनसंपर्क अधिकारी राज घरत यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले . आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही . 

या आधी अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे देखील कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल आहेत . शिवाय पालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांना सुद्धा लागण झाली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक