शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Mira Bhayander : मीरा भाईंदर महापालिकेचे कर व दरवाढ नसलेले २ हजार १७४ कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक 

By धीरज परब | Updated: March 14, 2023 17:14 IST

Mira Bhayander : मीरा भाईंदर महापालिकेचे सन २०२३ - २०२४ ह्या आर्थिक वर्षातले कोणतीही कर व दरवाढ नसलेले २ हजार १७४ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी सादर केले आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे सन २०२३ - २०२४ ह्या आर्थिक वर्षातले कोणतीही कर व दरवाढ नसलेले २ हजार १७४ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी सादर केले आहे . यावेळी आयुक्तांनी शहरातल्या ४५ रस्त्यांचे काँक्रीटीकरण , पालिका शाळांचे सर्व वर्ग डिजिटल करणे , पालिकेचे डाटा सेंटर उभारून अभिलेखाचे डिजिटायझेशन , ५७ ई बस खरेदी आदी अनेक विकासकामे करण्यावर भर दिला.

गेल्या वर्षी प्रशासना कडून  १ हजार ८१८ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले गेले होते . त्या मध्ये तत्कालीन स्थायी समिती व महासभेने वाढ करून ते  २ हजार २५१ कोटींचे मंजूर केले होते .  २००२ साली महापालिकेची पहिली निवडणूक झाल्या पासून आता पर्यंतच्या २१ वर्षांच्या कालावधीतील यंदाचे हे पहिलेच प्रशाकीय अंदाजपत्रक आहे.

२५ लाख शिलकीचे २ हजार १७४ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक आयुक्त दिलीप ढोले सह अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर , उपायुक्त मारुती गायकवाड , संजय शिंदे , कल्पिता पिंपळे व रवी पवार , शहर अभियंता दीपक खांबित , अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे , सचिव वासुदेव शिरवळकर , मुख्य लेखाधिकारी कालिदास जाधव , लेखाधिकारी अजित कुलकर्णी , मुख्य लेखापरीक्षक मंजिरी डिमेलो आदींनी सादर केले.

आयुक्त ढोले यांनी शहराच्या विकासकामांची माहिती देताना सांगितले कि , शहर खड्डेमुक्त रस्त्यांचे करण्याचा संकल्प असून ४५ प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणसाठी ९०४ कोटी ४७ लाखांच्या कामास मान्यता दिली आहे .  येत्या दिड - दोन वर्षात खड्डे मुक्त रस्ते होतील . 

पाणीटंचाई दूर करण्यासाठी अमृत २ अभियानांतर्गत रू. ५१६ कोटी ७८ लाखाच्या प्रकल्पास तर १७५ कोटी १९ लाखांच्या मल:निसारण योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ५६ कोटी २२ लाखांची तर कचरामुक्त शहराचे उद्दिष्ट समोर ठेवून स्वच्छ भारत अभियान साठी ४ कोटींची तरतूद केली आहे.  महापालिकेने शहराला उद्यानांचे शहर घोषित केले असून शहरातील उद्याने अधिक आकर्षित ,  सुशोभीत करण्यासाठी ५७ कोटी ६३ लाखांची तरतूद केली आहे . शहर सुशोभीत व सुंदर करण्यासाठी १० कोटींची तरतूद केली आहे. 

महापालिका शाळांचा दर्जा व शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी सर्च शाळांचे वर्ग डिजिटल केले जाणार आहे त्यासाठी १ कोटी , आधुनिक प्रयोगशाळांसाठी ५० लाख ,  दिव्यांग मुलामुलींच्या फिजिओथेरपी, इतर वैद्यकीय सोईसुविधा व  योजनां साठी ५ कोटी २५ लाख , महिला व बालकल्याणसाठी ६ कोटी ५८ लाख तर क्रीडा विभागासाठी ६ कोटी १२ लाखांची तरतूद अंदाजपत्रकात प्रशासनाने केली आहे .राज्य शासनाच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत वैद्यकीय तपासणीसाठी ५० लाख ठेवले आहेत . 

 उत्तन डम्पिंग येथील साचलेल्या कचऱ्यावर बायो मायनिंगसाठी २२ कोटी तर लहान बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी १० कोटींची तरतूद आहे . शासनाच्या निर्देशानुसार पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी महानगरपालिकेला १५ व्या  वित्त आयोगामार्फत स्वच्छ हवा कृती आराखडा साठी ४२ कोटी ७५ लाखांचा निधी मिळाला असून हवेची गुणवत्ता सुधारणेसाठी २ वाहनांवरचे डस्ट कंट्रोल मशीन,  ३ यांत्रिक सफाई यंत्र , नवीन हरीतपट्टे व कारंजे,  ई-बसेस, चार्जिंग स्टेशन आदी कामे केली जात आहेत असे आयुक्त यांनी सांगितले . 

रुपया असा येणार व असा जाणारमीरा भाईंदर महापालिकेच्या प्रशासकीय अंदाजपत्रका नुसार उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवताना मुख्य पैसे येण्याची अपेक्षा हि शासना कडून अनुदान , कर्ज आणि जीएसटीचा परतावा आदींवर आहे .  तर खर्चात बचत व काटकसर करणे देखील एकप्रकारे पालिकेचे उत्पन्न वाढविण्या सारखे असून त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले . 

उत्पन्नाची अपेक्षित बाब पाहता शासन अनुदान २९९ कोटी ४३ लाख , कर्ज द्वारे ४३३ कोटी , जिएसटी अनुदान २८० कोटी, मालमत्ता कर १२३ कोटी ४२  लाख, , १ टक्का मुद्रांक शुल्क नुसार ५५ कोटी, इमारत विकास आकार २०० कोटी, रस्ता नुकसान भरपाई ११० कोटी, मोकळ्या जागेवरील कर ५० कोटी, जाहिरात, होर्डिंग्ज व पे अँड पार्क मधून १४ कोटी, पाणी पुरवठा जल निसारण व मलनिःसारण मधून ४१९.६४ कोटी, बाजार फी ८ कोटी, घनकचरा शुल्क द्वारे २५ कोटी , अनधिकृत बांधकाम शास्ति ४ कोटी ७५ लाख , विशेष शिक्षण कर ८ कोटी, भांडवली जमा २७ कोटी ४६ लाख , वृक्षकर ४ कोटी १७ लाख , संकीर्ण २० कोटी ८० लाख , परवाना फी ५ कोटी आदी  विविध स्तोत्र जमेच्या स्वरूपात गृहीत धरण्यात आली आहेत . 

तर खर्चाच्या बाजू मध्ये  स्थायी व अस्थायी वेतानावरील खर्च १९७ कोटी ६३ लाख इतका होणार आहे . सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत दैंनदिन साफ व नालेसफाई करीत २०१ कोटी ६० लाख , घनकचरा व्यवस्थापन साठी १३१ कोरी १० लाख , कर्जाच्या परतफेडीसाठी ७५ कोटी , सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत विकासकामांसाठी ६०२ कोटी ९० लाख , पाणी पुरवठा व जल निसारण व मलनिस्सारण - ४३३ कोटी १० लाख , रुग्णालये दवाखाने  करीता ३० कोटी ८५ लाख , विद्युत देयके व विद्युत कामे साठी ५२ कोटी १० लाख , नगरसेवक व प्रभाग निधीसाठी २० कोटी , विकास आराखडा सक्तही १० कोटी ९० लाख , पर्यावरण विभाग करीता १३ कोटी ५० लाख , निवडणूक विभाग साठी १२ कोटी, शिक्षण विभाग साठी ४८ कोटी ३ लाख , उद्याने विकास खर्च करीत ५७ कोटी ६३ लाख , परिवहन विभागा देण्यास २८ कोटी अश्या प्रकारे खर्च केला जाणार आहे .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक