शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

मिरा-भाईंदरमध्ये खरी लढत भाजपा-शिंदेसेनेत? छुप्या युतीद्वारे पाडापाडीच्या खटाटोपांचे आरोप

By धीरज परब | Updated: January 5, 2026 10:04 IST

२४ प्रभागांतून ९५ जागांसाठी निवडणूक होत आहे.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मिरारोड :  मुख्य चुरस भाजप व शिंदेसेनेत होण्याची शक्यता  असली तरी काँग्रेसलाही काही प्रभाग राखण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही फिस्कटली असून केवळ उद्धवसेना आणि मनसे हेच एकत्र लढत आहेत. मात्र, एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी छुप्या युतींचे आरोप केले जात आहेत.

२४ प्रभागांतून ९५ जागांसाठी निवडणूक होत आहे. स्थानिक नेतृत्वामुळे येथे महायुती होऊ शकली नाही. त्यामुळे भाजपने ८७, तर शिंदेसेनेने ८१ उमेदवार उभे केले आहेत. पाठोपाठ उद्धवसेनेने ५६, तर मनसेने ११; काँग्रेसने बविआला एका जागी सोबत घेत ३२ जागी उमेदवार उभे केले आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार)ने ३३, तर राष्ट्रवादी (शरद पवार)ने १४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.  वंचित, एमआयएमने ठराविक जागी उमेदवार दिले आहेत. ल राजस्थानी, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य पाहता भाजपला हे हक्काचे मतदार वाटत असल्याने त्यांना यश मिळेल, अशी खात्री आहे. 

कोण काय म्हणाले?

भाजप आमदार नरेंद्र मेहता हे वारंवार भाजपचा जनाधार असून शिंदेसेनेमुळे आम्हाला काहीच फायदा नाही, अशी भूमिका मांडत आहेत. तर गेल्या काही वर्षात विकासकामांच्या आणि सर्व जाती - प्रांतवासीयांना एकत्र आणण्याच्या बळावर पालिकेत सत्ता येण्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करत आहेत.

भाजपत सर्वाधिक बंडखोरी

भाजपने अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुक पदाधिकाऱ्यांची तिकिटे कापल्याने या पक्षाच्या विद्यमान आमदारांवर रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजपतून सर्वाधिक बंडखोर झाली. शिंदेसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपने उद्धवसेना, एमआयएम, वंचित यांना बळ दिले गेल्याचे आरोप होत आहेत. उद्धवसेनेची ताकद कमी असतानाही त्यांनी  अवास्तव जागा मागितल्याचा आरोप  मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसने केला. मराठी मते विभागण्याची भाजपची खेळी असल्याचा आरोप शिंदेसेनेचा आहे. तर काँग्रेसचा प्रभाव असलेल्या  भागात एमआयएम, वंचित बहुजन आघाडी व उद्धवसेनेने उमेदवार उभे केले असून त्यांना रसद देण्याचे काम भाजपने केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.  तसेच शिंदेसेना व काँग्रेसने छुपी युती केल्याचा आरोप  भाजप आ. मेहता यांनीदेखील केला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena Face Off in Mira-Bhayandar; Alliance Accusations Fly

Web Summary : Mira-Bhayandar elections see BJP and Shinde Sena in a key battle. Accusations of secret alliances to undermine opponents are rife. While Congress fights to hold ground, internal conflicts and rebel candidates add complexity to the political landscape.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा