मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:02 IST2025-05-01T13:02:31+5:302025-05-01T13:02:50+5:30
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व पोलिसांनी मानवंदना देऊन साजरा करण्यात आला.

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांचा सत्कार
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व पोलिसांनी मानवंदना देऊन साजरा करण्यात आला.
यावेळी विशेष कामगिरी, शौर्य, प्रामाणिक सेवा, उत्कृष्ट तपास, धाडस पूर्ण कारवाया आणि लोकहितासाठी केलेले उल्लेखनीय योगदान आदींचा विचार करून प्रशासकीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त ६ अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दिनकर निकम, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत अनंत देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष बाबुराव चव्हाण, अविनाश बाबासाहेब गर्जे व संजय दयाराम शिंदे आणि पोलीस हवालदार सचिन सिद्धराम दोरकर यांना आयुक्तांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
२०२३ ते २०२५ दरम्यान पालिका शाळांमध्ये राबवलेल्या स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमात चांगली कामगिरीबद्दल मीरा भाईंदर महापालिकेच्या काशी शाळा क्र. ४ ने सर्वोत्कृष्ट शाळेचा पहिला क्रमांक पटकावला. मीरारोड शाळा क्रमांक ३४ ने दुसरा तर विरारच्या नेहरू हिंदी जिल्हा परिषद विद्यालय ने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. आयुक्तांनी सदर शाळांना प्रशंसापत्र देऊन कौतुक केले. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, मुख्यालय उपायुक्त डॉ. सुहास बावचे सह अनेक अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.