शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा कोर्टाबाहेर विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:57 IST

वर्षभरापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच आरोपीने कोर्टाबाहेर विनयभंग केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली.

ठाणे : वर्षभरापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच आरोपीने कोर्टाबाहेर विनयभंग केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली.पंधरावर्षीय पीडित मुलगी ठाण्यातील मीरा रोडची रहिवासी आहे. वर्षभरापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती २९ जुलै रोजी आईवडिलांसोबत ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात आली होती. सुनावणी आटोपल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या न्यायालयाच्या तीन नंबरच्या प्रवेशद्वाराजवळ आरोपीने तिचा विनयभंग केला. पुन्हा एकदा बलात्कार करण्याची धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी ३१ जुलै रोजी याप्रकरणी आरोपी जगजितसिंग स्वर्णसिंग हिन्ना आणि त्याची पत्नी मंगला जगजितसिंग हिन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.जगजितसिंग स्वर्णसिंग हिन्ना आणि पीडित मुलीमध्येही प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊन पीडित मुलीने त्याच्याविरोधातही लैंगिक अत्याचाराची तक्रार गतवर्षीच दिली होती. त्यानुसार, नयानगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांची सुनावणी २९ जुलै रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये होती. सुनावणी आटोपल्यानंतर न्यायालयाबाहेर फिर्यादी आणि आरोपीकडील पुरुषांमध्ये जुंपली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात येऊन आरोपींनी विनयभंग केल्याची तक्रार दिली. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सांगितले. आरोपींचे तीन पत्ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिले होते. मात्र, त्या तिन्ही पत्त्यांवर आरोपींचा ठावठिकाणा नसल्याचे कुंभार यांनी सांगितले.वडिलांकडूनच अत्याचार?-तक्रारीच्या प्राथमिक तपासात पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने आंतरधर्मीय विवाह केला. पीडित मुलीवर वडीलच लैंगिक अत्याचार करतात, अशी तक्रार तिच्या आईने गतवर्षी काशिमीरा पोलीस ठाण्यात दिली होती.