उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
By सदानंद नाईक | Updated: August 29, 2024 19:31 IST2024-08-29T19:31:21+5:302024-08-29T19:31:49+5:30
याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
सदानंद नाईक
उल्हासनगर : सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत २३ वर्षाच्या तरुणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवरून एका २३ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या या ओळखीचे रूपांतर नंतर भेटींमध्ये झाले. या भेटींच्या दरम्यान, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीच्या पोटात सतत दुखत असल्याने, तीच्या पालकांनी तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले.
याप्रकाराने कुटुंबीयांना धक्काच बसला. पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तरुणां विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. तसेच मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त अनिल कोळी अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी दिली असून कोळी यांच्याशी याप्रकरणी संपर्क होऊ शकला नाही. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने, पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईलवरील ऑनलाईन बाबत सतर्क राहावे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.