५ मजल्यावरून पडून अल्पवयीन मुलगा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 00:29 IST2023-04-07T00:29:18+5:302023-04-07T00:29:18+5:30
भाईंदर पूर्वेच्या नर्मदानगर मध्ये ओमकार रेसिडेन्सी इमारतीत ही घटना घडली.

५ मजल्यावरून पडून अल्पवयीन मुलगा जखमी
मीरारोड - भाईंदर पूर्वेस ५ व्या मजल्यावरून पडून १७ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. सुदैवाने तो बचावला असून त्याचे दोन्ही पाय व उजवा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. भाईंदर पूर्वेच्या नर्मदानगर मध्ये ओमकार रेसिडेन्सी इमारतीत ही घटना घडली.
बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुलगा मयांक पाल ( १७ ) हा ५ व्य मजल्या वरून पडून जखमी झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना समजली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवघर पोलिसांनी सदर घटनेची नोंद करून तपास चालवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मयांक हा शेजारच्या विंगमध्ये मंगळवारच्या रात्री उशिरा कुणाला तरी भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा सदर घटना घडली. त्याने काही कारणाने वरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला की तो खाली पडला? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ५ व्य मजल्या वरून पडून तो सुदैवाने वाचला त्या बदल लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.