पीडित महिलेवर बलात्कार प्रकरणी मंत्रिकास अटक

By धीरज परब | Updated: July 24, 2023 19:42 IST2023-07-24T19:42:38+5:302023-07-24T19:42:57+5:30

५७ वर्षीय मंत्रिकास भाईंदर पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत.

Minister arrested in case of rape of victim | पीडित महिलेवर बलात्कार प्रकरणी मंत्रिकास अटक

पीडित महिलेवर बलात्कार प्रकरणी मंत्रिकास अटक

मीरारोड - अडीअडचणी दूर करण्यासाठी काळी जादू व विधी करण्याच्या आड ३५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केला प्रकरणी ५७ वर्षीय मंत्रिकास भाईंदर पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत.

भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या मांत्रिक मुकेश दरजी ह्याच्या कडे पीडिता ही २०१६ साली आपल्या व्यथा व अडचणीतून मार्ग काढावा म्हणून गेली होती. मांत्रिक याने  मागील पाच वर्षांचे दुःख व अडीअडचणी घालवण्यासाठी वेळ लागतो सांगत त्यासाठी विधी करावा लागेल आणि काळ्या विद्येने अडचणी दूर होतील असे आश्वस्त केले. २०१६ पासून तो पीडिते वर लैंगिक अत्याचार करत होता. 

पीडितेच्या फिर्यादी नंतर भाईंदर पोलिसांनी दरजी ह्याला सोमवारी दुपारी अटक केली. नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा यांना प्रतिबंध समूळ उच्चाटन करण्याचा अधिनियम सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहायक पोलिस निरीक्षक विश्वास बाबर हे तपास करत आहेत.

Web Title: Minister arrested in case of rape of victim