आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करा एमआयएमची मागणी
By कुमार बडदे | Updated: January 11, 2023 21:13 IST2023-01-11T21:13:09+5:302023-01-11T21:13:52+5:30
पठाण यांनी केलेल्या या मागणीमुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करा एमआयएमची मागणी
मुंब्रा : कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवर औरंगजेबासंदर्भात चुकीचा इतिहास सागितला. यामुळे मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हणत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी एमआयएमचे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सरफराज खान उर्फ सैफ पठाण यांनी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्याकडे बुधवारी निवेदनाच्या माध्यमाने केली आहे.
गेल्या ८ जानेवारीला एका मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारीत झालेल्या वृत्तामध्ये आव्हाड यांनी औरंगाजेब हे कृर तसेच माणुसकीला कलंक होते. असे वक्तव्य केल्याचा दावा पठाण यांनी केला असून,त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पठाण यांनी केलेल्या या मागणीमुळे आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.