ठाण्यात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याचा अपवय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:51 PM2021-03-01T20:51:28+5:302021-03-01T20:54:58+5:30

माजीवडा उड्डाण पूलाजवळ कापूरबावडी परिसरात मेट्रोच्या खोदकामामुळे एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सुमारे दोन तासांसाठी वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे ६०० ते ६५० ग्राहकांना याचा फटका बसला.

Millions of liters of water wasted due to rupture of MIDC aqueduct in Thane | ठाण्यात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याचा अपवय

मेट्रोच्या कामामुळे लागला धक्का

Next
ठळक मुद्देमेट्रोच्या कामामुळे लागला धक्का ६०० ग्राहकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: माजीवडा उड्डाण पूलाजवळ कापूरबावडी परिसरात मेट्रोच्या खोदकामामुळे एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या जलवाहिनीतून मोठया प्रमाणात पाण्याचे फवारे बाहेर पडल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेल्याचे पहायला मिळाले.
ठाणे शहरात सध्या मोठया प्रमाणात मेट्रोचे काम सुरु आहे. या कामासाठी आवश्यक असलेल्या पिलर खोदकामामुळे जलवाहिन्यांनाही धक्का बसत आहे. सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ज्युपीटर हॉस्पिटलजवळ हरदासनगर, कापूरबावडी परिसरात मेट्रोच्या खोदकामामुळे एमआयडीसीच्या जलवाहिनीला धक्का लागला. या जलवाहिनीतून निघालेले पाण्याचे फवारे हे लगतच्या ब्रिजच्या दुप्पट उंचीवर उडत होते. यात एमआयडीसीचे लाखो लीटर पाणी वाहून गेले. जलवाहिनी फुटल्याच्या ठिकाणी मोठे कारंजे उडत असल्याचे चित्र होते. त्यामुळे याठिकाणी बघ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस, ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी धाव घेत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत, अवघ्या तासाभरामध्ये हे काम पूर्ण केले.
* सुमारे दोन तासांसाठी वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे ६०० ते ६५० ग्राहकांना याचा फटका बसला.

Web Title: Millions of liters of water wasted due to rupture of MIDC aqueduct in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.