शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

हॉटेलचालकांची लाखोंची बिले; ठामपाने आतापर्यंत केले ४० लाख अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:58 PM

वैद्यकीय कर्मचाऱ्यांची केली होती व्यवस्था

ठाणे : कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होऊ लागले आहे. परंतु, जेव्हा कोरोनाची महामारी सुरू होती, त्यावेळेस महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस व इतर अत्यावश्यक स्टाफसाठी शहरातील काही हॉटेल ताब्यात घेतले होते. आता याच हॉटेलचालकांनी महापालिकेला लाखोंची बिले पाठवून झालेला खर्च परत मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेनेदेखील आतापर्यंत ४० लाखांची बिले अदा केली आहेत.

मार्चपासून महापालिकेने काही इमारती, शाळा, हॉस्पिटल व हॉटेल रुग्णांसाठी अधिगृहीत केली होती. परंतु, या ठिकाणी दाखल रुग्णांवर उपचारासाठी असलेल्या नर्स, डॉक्टर व इतर अत्यावश्यक स्टाफसाठीदेखील घरी जाणे मुश्कील होते. त्यांना रोजच्या रोज घरी जाणेही शक्य होत नव्हते. किंबहुना, सोसायटीत त्यांना घरी घेत नव्हते. अशा परिस्थितीत महापालिकेने जी हॉटेल ताब्यात घेतली होती, त्याठिकाणी त्यांची व्यवस्था केली होती.

ही व्यवस्था करताना रोजचा खर्च किती होणार, तो कोण करणार, असा पेचही निर्माण झाला होता. त्यामुळे तो महापालिका उचलेल, असे त्यावेळेस निश्चित झाले होते, अशी माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी दिली. त्यानुसार, आता शहरातील त्या आठ रुग्णालयांनी लाखोंची बिले पालिकेला धाडली आहेत.  यामध्ये एका पंचतारांकित हॉटेलने तर चक्क ५ ते २० लाखांहून अधिकचे बिल धाडले आहे. त्यामध्ये रोजचा खर्च किती, रूमचे भाडे किती, याचा कोणताही उल्लेख केला नसल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका