शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ठामपाकडून म्हाडाची १४ कोटींची कोरोनासामग्री लंपास, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 3:03 AM

ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केले असून त्यांनी जर ते जसे होते, त्या स्थितीत ४८ तासांत पुन्हा ठेवले नाही, तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू

ठाणे : कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावले होते. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केले असून त्यांनी जर ते जसे होते, त्या स्थितीत ४८ तासांत पुन्हा ठेवले नाही, तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दिला. मंत्र्यांनीच ठामपावर चोरीचा आरोप केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आव्हाड यांच्या आदेशानुसार कौसा येथे म्हाडाने अद्ययावत अशा कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. हाच फायदा घेऊन डॉ. मुरूडकर यांनी सर्व साधने लंपास केली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आव्हाड यांनी कौसा येथील रुग्णालयाची पाहणी केली असता, हा प्रकार उघड झाला. ही यंत्रणा उद्ध्वस्त करणाऱ्या डॉ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. सुरक्षारक्षकांकडे विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला.  डॉ. मुरूडकर यांनी रुग्णालयातील ९४ व्हेंटिलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहे. म्हाडाच्या मालकीची ही साधने काढून नेताना पाइपलाइनदेखील तोडून टाकण्याचे काम त्यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे १२ ते १४ कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली, असा सवाल करून अशा बेजबाबदार  अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे. तसेच येत्या ४८ तासांमध्ये सर्व साधने पूर्वस्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. मुंब्रा येथील कौसा कोविड सेंटर डिसेंबर २०२० मध्ये बंद झाले होते. त्यामुळे तेथील साधनसामग्री ही तशीच पडून होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या परवानगीने या सामग्रीमधील ३० व्हेंटिलेटर ग्लोबल हॉस्पिटल आणि ६४ पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. ते लंपास केलेले नाहीत. यातील पार्किंग प्लाझाचे व्हेंटिलेटर्स परत केले असून ग्लोबलचेही परत केले जाणार आहे. म्हाडा अथवा गृहनिर्माणमंत्र्यांची परवानगी घेतली नाही. हीच चूक झाली.- डॉ. राजू मुरूडकर, आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाmhadaम्हाडाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड