Video : माथेफिरू चढला ओव्हरहेड वायरच्या खांबावर अन् प्रवाशांचा झाला खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 21:10 IST2019-08-14T21:06:24+5:302019-08-14T21:10:22+5:30

मुलुंड ते नाहूरच्यादरम्यान ७ लोकल पाठोपाठ उभ्या आहेत.

Mentally disturbed man climbed overhead wire poles and passengers were stucked | Video : माथेफिरू चढला ओव्हरहेड वायरच्या खांबावर अन् प्रवाशांचा झाला खोळंबा

Video : माथेफिरू चढला ओव्हरहेड वायरच्या खांबावर अन् प्रवाशांचा झाला खोळंबा

ठळक मुद्दे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. धीम्या गतीने जाणाऱ्या मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. 

ठाणे - ठाण्यात ओव्हरहेड वायरच्या खांबावर एक माथेफिरु चढला होता. त्याला आता खाली उतरवण्यात आलं आहे. मात्र, त्यामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर चांगलाच खोळंबा झाला होता. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. मुलुंड ते नाहूरच्यादरम्यान ७ लोकल पाठोपाठ उभ्या होता.

ठाणे स्टेशनजवळच्या ओव्हरहेड वायरच्या खांबावर एक माणूस चढला होता. तो खाली उतरायलाच तयार नव्हता. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्यामागोमाग सात लोकल थांबवण्यात आल्या. धीम्या मार्गावर ही समस्या उद्धभवली होती असून अनेकांनी खाली उतरुन ट्रॅकवरुन चालत जाणे पसंत केले. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी या माणसाला खाली उतरवण्यात यश आले. अग्निशमन दलाने सुमारे ४५ मिनिटांनी या माणसाला खाली उतरवण्यात आले आहे. मात्र मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. धीम्या गतीने जाणाऱ्या मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. 

Web Title: Mentally disturbed man climbed overhead wire poles and passengers were stucked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.