शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

पुरुषप्रधान व्यवस्थेचा त्रास पुरुषांनाही जाणवताे - मुक्ता दाभाेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 11:55 PM

वुमन अँड चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देवुमन अँड चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रीवर्गाला जसा मानसिक शारीरिक त्रास होतो तसाच तो पुरुष वर्गाला होत असतो. त्यामुळे या पुरुषसत्ताक व्यवस्थेला गाडून दोन्ही वर्ग एकत्रित मार्गक्रमण करतील, तेव्हाच खरा महिला दिन साजरा होऊ शकेल, असे  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी साेमवारी भिवंडी येथे मत व्यक्त केले.

वुमन अँड चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दाभाेलकर म्हणाल्या की, स्त्रियांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळेच आपली समाजातील जागा आपण बदलू शकतो. यावेळी भिवंडी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भिवंडी तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गांधी विचारांच्या प्रचारक साधना वैराळे, पंचायत समिती सभापती ललित पाटील, उपसभापती सबिया इरफान भुरे, भ्रष्टाचार निर्मूलन न्यासाचे विश्वस्त अल्लाउद्दीन शेख, तहसीलदार अधिक पाटील, नायब तहसीलदार गोरख फडतरे, महेश चौधरी, वूमन अँड चाइल्ड फाउंडेशनचे प्रभाकर जाधव, अलंकार वारघडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर जाधव तर आभार प्रदर्शन अलंकार वारघडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रसाद काबाडी यांनी केले.