शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:32 IST

मीरा-भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक प्रकाश दुबोले यांनी महिला जिल्हाध्यक्ष फ्रिडा मोरायस आणि काही पदाधिकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केला आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक प्रकाश दुबोले यांनी महिला जिल्हाध्यक्ष फ्रिडा मोरायस आणि काही पदाधिकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे येथील कार्यकारिणी बरखास्त झाली असून कार्याध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी मात्र दुबोलेंची हकालपट्टी केल्याचे सांगितले.मीरा-भार्इंदरमध्ये एकेकाळी सत्तेत असणारी तसेच खासदार, आमदार असणारी राष्ट्रवादी काँग्रेस २०१७च्या महापालिका निवडणुकीआधी नाममात्र उरली. पक्षाचे सर्व नगरसेवक तसेच माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे भाजप, तसेच शिवसेनेत गेले. पालिका निवडणुकीत तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दाणदाण उडाली. दरम्यान, नाईक यांचे समर्थक प्रकाश दुबोले यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली, तर नाईक समर्थक फ्रिडा मोरायस यांची महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली.आता गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मीरा-भार्इंदरमध्येदेखील राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये जाणार, हे निश्चित होते. दुबोले यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेश सरचिटणीस यांच्याकडे दिला. कार्याध्यक्ष संतोष पेंडुरकर आणि निरीक्षक अशोक पराडकर यांच्या गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याचे दुबोले म्हणाले. त्यानंतर, शुक्रवारी दुबोले यांनी फ्रिडा व काही पदाधिकाऱ्यांसह भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी किमान वेतन महामंडळ अध्यक्ष आसीफ शेख, ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील आदी हजर होते. दुबोले, फ्रिडा आदींच्या भाजप प्रवेशाने पक्षाची ताकद आणखी वाढणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.दरम्यान, पेंडुरकर यांनी मात्र दुबोले यांची पक्षाने हकालपट्टी केलेली असून, त्यांनी स्वार्थासाठी पक्ष व पदाचा वापर चालवला होता. याआधी त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यास आम्ही विरोध केला होता. लोकहिताचे विषय न घेता तेच गटबाजी करत होते. त्यांचे भाऊ रवी दुबोले पालिकेचे ठेकेदार असून त्यांची सत्ताधारी भाजपने कोंडी केली होती, असे पेंडुरकर म्हणाले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा