शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारां सोबत भाजपा आणि अजीत पवारांच्या निषेधार्थ घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 19:35 IST

 मीरा भाईंदर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आमचे झुंझार पक्षाध्यक्ष शरद पवारांसोबत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि अजित पवारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 

मीरारोड: मीरा भाईंदर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आमचे झुंझार पक्षाध्यक्ष शरद पवारांसोबत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि अजित पवारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस उभारी देत सत्तेच्या जवळ आणले असताना आज शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी राजभवनवर शपथ घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

अजित पवार व देवेंद्र फडणवीससह भाजपाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौका जवळ केले. भाजपाने सत्ते साठी फोडाफोडी चे घाणेरडे राजकारण करतानाच त्यांच्या सह राज्यपालांनी देखील देशाच्या संविधान आणि लोकशाहीला काळिमा फासल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी केला. 

आम्ही शरद पवारांसोबतच कायम राहणार असून त्यांना या वयात दगाबाजीचा खंजीर खुपसणाऱ्या अजित पवार व देवेंद्र फडणवीससह भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही असा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात  युवक जिल्हाध्यक्ष साजिद पटेल, जक्की पटेल, तारिक जमीनदार, सुरेश सकपाळ, सुप्रिया माईणकर, आशा शिंदे, अनिल साबळे, अनंत म्हात्रे, बाबा पठाण, भिलारे, किणी, अमितसिंग ठाकूर  प्रकाश मुरुकते, शीतल गायकवाड, सुमित्रा करकरे,  सुनील उपाध्याय, सावंत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार