शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भार्इंदरमधील 35 ऑर्केस्ट्रा बार पुन्हा होणार सुरू, गृह खात्यानंच महसूल विभागाच्या आदेशाला दिली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 15:03 IST

मीरा भार्इंदरमध्ये आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणा-या अश्लिल व अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर महसूल विभागाने तब्बल ४२ आॅर्केस्ट्रा बारचे सादरीकरण परवाने रद्द केले असतानाच गृह खात्यानेच महसूल विभागाच्या आदेशाला स्थगिती देत तब्बल ३५ आॅर्केस्ट्रा बार सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

मीरारोड - मीरा भार्इंदरमध्ये आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणा-या अश्लिल व अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर महसूल विभागाने तब्बल ४२ आॅर्केस्ट्रा बारचे सादरीकरण परवाने रद्द केले असतानाच गृह खात्यानेच महसूल विभागाच्या आदेशाला स्थगिती देत तब्बल ३५ आॅर्केस्ट्रा बार सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.मीरा भाईंदर म्हणजे लेडिज आॅर्केस्ट्रा बार व लॉजींगचा सुकाळ आणि त्यातून चालणा-या अश्लिल अनैतिक तसेच  देहविक्री व्यवसायाच्या प्रकारांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. सर्वसामान्य नागरिक या अनैतिक बाजाराला त्रासले असले तरी यासारख्या प्रकारांसाठी मुंबई, ठाणे, पालघरच नव्हे तर अगदी गुजरात, राजस्थान व अन्य राज्यातूनदेखील ग्राहकांचा मोठा राबता असतो. त्यातूनच आॅर्केस्ट्रा बार व खेटुनच असणा-या लॉजमधून कोट्यवधी रुपयांची चाललेली उलाढाल डोळे दिपवणारी आहे.आॅर्केस्ट्रा बारमधून गायिकांच्या नावाखाली असलेला बारबालांचा राबता व बेधडक चालणारे नृत्य. गायकांच्या नावाखाली सीडीवरच वाजवली जाणारी गाणी. नियमापेक्षा अधिक संख्येने बारबालांची रेलचेल. पोलिसांची धाड पडलीच तर बारबालांना लपवण्यासाठी गुप्त खोल्या आदी आढळून आल्या.बहुतांशी आॅर्केस्ट्रा बार व लॉजची बांधकामे अनधिकृत असतानादेखील महापालिका व लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने अगदी पोलीस खात्यासह अन्य तक्रारी असुनसुद्धा त्यावर ठोस तोडक कारवाई होत नाही. आता तर अरविंद शेट्टी, गणेश शेट्टी आदी बार व लॉज चालकच नगरसेवक झाल्याने पालिका कारवाई करणे तक्रारदारांना अशक्य वाटत आहे.महापालिका व लोकप्रतिनिधींकडून अनैतिक व अश्लिल प्रकार चालणा-या आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातले जात असताना दुसरीकडे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील व स्थानिक पोलीस ठाण्यांनी मात्र पालिकेकडे पत्रव्यव्हार सुरूच ठेवले. तर आॅर्केस्ट्रा बारविरोधात अटिशर्तिंचे उल्लंघन, दाखल गुन्हे, अनधिकृत बांधकाम आदी मुद्यांवर सादरीकरण परवाने देऊ नये, असे प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवले होते. तसेच सादरीकरण परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे पोलिसांनी आॅर्केस्ट्रा बार चालकांना नोटीसा बजावून आॅर्केस्ट्रा बंद पाडले.जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याशी डॉ. पाटील यांनी चर्चा करुन आॅर्केस्ट्रा बारमधील चालणा-या प्रकारांची व दाखल गुन्हे आदींची माहिती दिली. पोलिसांच्या प्रस्तावानुसार तहलसिदार किसन भदाणे यांनी सप्टेंबरमध्ये ४२ आॅर्केस्ट्रा बारचे सादरीकरण परवाने रद्द करुन टाकले होते.शहरातील ४५ पैकी तब्बल ४२ आॅर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द झाल्याने बार चालकांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी बार चालकांनी गृह विभागाकडे धाव घेतली. तहसीलदारांनी आधी दिलेली नोटीस ही परवाना स्थगिती बद्दलची होती. पण आदेश मात्र परवानाच रद्द केल्याचा दिला. शिवाय सादरीकरण परवान्याचे शुल्कदेखील बार चालकांकडून भरुन घेण्यात आले होते, असा दावा बार चालकांनी केला.गृह विभागाने या प्रकरणी १६ आॅक्टोबर रोजी बोलावलेल्या सुनावणी वेळी स्वत: तहसिलदार वा त्यांचा कोणी प्रतिनिधीच गेला नाही. विशेष म्हणजे गृह विभागाने आॅर्केस्ट्रा बार चालकांसाठी गतीमान कारभाराची चुणुक दाखवत तत्काळ दुस-या दिवशीच म्हणजे १७ आॅक्टोबर रोजी तहसिलदारांच्या सादरीकरण परवाने रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देऊन टाकली. इतकेच नव्हे तर तहसिलदारांनी केलेली कार्यवाही सकृतदर्शनी अयोग्य असल्याचा ठपका ठेवतानाच अंतिम सुनावणी होईपर्यंत आॅर्केस्ट्रा बार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे देखील गृह विभागाचे कक्ष अधिकारी श.र.सावंत यांनी तहसिलदार, ठाणे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आतापर्यंत ३५ आॅर्केस्ट्रा बार चालकांना दिलासा देणारा निर्णय गृह विभागाने दिल्याने पोलिसांनी या आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणा-या अश्लिल व अनैतिक गैरप्रकारांविरोधात घेतलेल्या मोहिमेला खो बसला आहे. 

टॅग्स :thaneठाणे