शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महापौरपदाचा विजय जळगावात, जल्लोष ठाण्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 3:42 AM

राज्यात एकत्र आल्यापासून प्रत्येक महापालिका काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार भाजपला पहिला फटका राष्ट्रवादीने सांगलीत दिल्यानंतर गुरुवारी शिवसेनेने जळगाव महापालिकेत मोठा शॉक दिला.

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीवरून मोठे राजकारण सुरू आहे. गुरुवारी झालेल्या या महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून, जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विजय जरी जळगावमध्ये झाला असला तरी त्याचा जल्लोष मात्र ठाण्यातील घोडबंदर रोडवर झाला. जळगाव महापालिकेतील भाजपच्या २७ फुटीर नगरसेवकांसह एमआयएमचे ३ आणि शिवसेनेचे १५ नगरसेवक ठाण्यातील एका हॉटेलात ठाण मांडून होते. त्याचाच फटका भाजपला बसल्याचे दिसले.राज्यात एकत्र आल्यापासून प्रत्येक महापालिका काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार भाजपला पहिला फटका राष्ट्रवादीने सांगलीत दिल्यानंतर गुरुवारी शिवसेनेने जळगाव महापालिकेत मोठा शॉक दिला. स्पष्ट बहुमत असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना ४५ तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना ३० मते मिळाली. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.  या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने एक आठवड्यापूर्वी भाजपसह एमआयएमचे मिळून ३० नगरसेवक आणि पक्षाच्या १५ नगरसेवकांचा मुक्काम ठाण्यातील घोडबंदर भागातील आलिशान असलेल्या बाइक प्लाझा हॉटेलमध्ये ठेवला होता. त्यांना काय हवे काय नको यासाठी ठाण्यातील शिवसैनिक दिवसरात्र राबताना दिसत होते. खाण्यापिण्याबरोबर मद्याचीही सोय या सर्वांना केल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार याच हॉटेलमध्ये राहून या नगरसेवकांनी वेबिनार महासभेच्या माध्यमातून लॅपटॉपद्वारे मतदान केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. भाजपचे नगरसेवक फोडल्याने आपल्या पक्षातील नगरसेवकदेखील फुटू शकतात, अशी भीती शिवसेनेलाही होती. त्यामुळे त्यांनी आपले १५ नगरसेवकदेखील ठाणे  मुक्कामी आणले होते. आता निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर या सर्व नगरसेवकांना बसने जळगावला रवाना केले आहे.ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार विनायक राऊत आणि भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांनी तर नगरविकास मंत्री या नात्याने भाजपने पक्षादेश झुगारल्याने तुमचे सदस्यत्व बाद करण्याची मागणी केली तरी कायद्यातील पळवाटा शोधून अभय देण्याची ग्वाही या २७ नगरसेवकांना दिल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMayorमहापौरthaneठाणे