शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

अमली पदार्थ : एक अदृश्य आक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:18 IST

२६ जून हा अमली पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून जगभर मानला जातो. भारतातील त्यांचे विदारक भीषण स्वरूप यावर प्रकाश टाकणारा लेख

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीनुसार २०११ मध्ये दिल्लीतील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या ५०९२३ इतक ी होती. त्यापैकी ९० टक्के म्हणजे ४६४११ मुलांना अमली पदार्थांचं व्यसन जडलेलं आढळून आलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या संसथेने म्हटले आहे की २०१५ आणि २०१६ मध्ये १८ वर्षाखालील मुले अनुक्रमे ५३ व ३४ मुले अनैसर्गिक मृत्युची शिकार झाली. त्याचे कारण अमली पदार्थाचे अतिरिक्त सेन (ड५ी१ङ्मि२ी).युनायटेड नेशन्स आॅफिस आॅन ड्रग अ‍ॅण्ड क्राईम (वठडऊउ) यांच्यानुसार भारतातील अनेक राज्यात १ ते ३ टक्के एवढे व्यसनांचे प्रमाण असून ते युरोपमधील ०.१ टक्के व अमेरिकेतील ०.२ टक्के या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे.पंजाबमध्ये अमली पदार्थ (विशेषत: हेरॉईन) सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असून ७० टक्के युवावर्ग या व्यसनाने बाधीत झाले आहेत. २०१५ साली झालेल्या सरकारी पाहणीत पंजाबमध्ये अमली पदार्थ सेवन करणाºयात ८९ टक्के लोक साक्षर व सुशिक्षित होते तर ५६ टक्के ग्रामीण भागातील होते.तरुणांमध्ये अमली पदार्थ व्यसनाचं मुख्य कारण म्हणजे याचं असणं म्हणजेच उपलब्ध असणं आणि मन कसल्यातरी तणावाखाली असणं म्हणजेच उपलब्ध असणं शिवाय लोकप्रिय माध्यमातून होणारं गौरवीकरण. तरुणांना त्यातला थरार अनुभवायचा असतो म्हणून त्याची भुरळ पडते. जीवनानुभवाच्या अपरिपक्वतेचा कच्चा दुवा आणि दोस्तकंपनी आग्रह यामुळं ही मुलं अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकतात. कोणत्याही बाबतीतली तारुण्यसुलभ, उत्सुकता, काहीतरी वेगळं क रण्याची, बंड करण्याची एक प्रकारची खुमखुमी, यातूनच अमली पदार्थांचे सेवन घडते. अफू, चरस, गांजा यापासून के-२, एक्ससी, अ‍ॅम्फटामाईन, एमडी असे अनेक सिंथेटीक मादक पदार्थ सेवन केले जात आहेत़ मादक पदार्थांच्या सेवनाने माणासचे स्वत: व इतरांचे मानसिक, शारिरीक, नैतिक आणि आर्थिक नुकसान होते हे सत्य असूनही काही लोक त्याचे समर्थन करून इतरांची दिशाभूल करीत असतात. हृदयासन शकता येते, एकाग्रता स्मरणशक्ती वाढते, सेक्सपॉवर वाढते. खेळ किंवा रंगभूमीवरील आपली अदाकारी खुलवता येते इत्यादी दाव्यानिशी काही लोक त्याची भलामण करतात.- डॉ. अजित मगदूम, संचालक अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, वाशीउपाय काय?वैद्यकीय तज्ञ व्यवसायिक, कुटुंब, शाळा महाविद्यालये व बाजूबाजूचा एकंदर समाज यांनी जबाबदार भूमिका अमली पदार्थविरुद्ध बजावली पाहिजे. माध्यमे विशेषत: कर मनोरंजन क्षेत्राने व्यसनाचं स्तुतीकरण, गौरवीकरण, जाहिरात व्यापक समाजहिताच्या दृष्टीकोनातून कटाक्षाने टाळणे आवश्यक तर आहेच पण त्याच्या दुष्परिणामांचा प्रसार करण्याची सकारात्मकता बाळगली पाहिजे. कोणत्याही दृष्टीनं विचार केला तरी अमली पदार्थांचे सेवन हे हानीकारकच आहे, हे शाळकरी व किशोरवयीनांना बिंबवले पाहिजे. संवेदनशील समाजगटाने राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील तर राहिले पाहिजे.उपचार काय?जे अमली पदार्थांच्या व्यसनात अडकलेले आहेत त्याना तुच्छतेने न वागवता व्यसन हा एक आजार झालेला रुग्ण म्हणून त्यावरील उपचार केले पाहिजेत. अनेकांना यावर काही उपचार करून बरे करता येते, हे माहित नसते. अनेकजण व्यसनीला बाबा, महाराज, मांत्रिक यांच्याकडे घेवून जातात. काहीजण टीव्हीवरील जाहिरात वाचून औषध गोळ्या मागवून घेतात. परुं या दोन्ही मार्गाने व्यसन सुटत नाही. सुटले तर ते तात्पुरते सुटेल.भारताला अमली पदार्थांचा धोका अधिकभारत हा अमली पदार्थांच्या आंतरराष्टÑीय वाहतुकीच्या पट्ट्यात येत असल्याने हा प्रश्न जटील झाला आहे. एकीकडे अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान ज्याला सुवर्ण चंद्रकोर (ॠङ्म’ीिल्ल ू१ीूील्ल३) म्हटलं जातं तिकडून तसेच दुसºया बाजूला म्यानमार, लाओस, थायलंडमध्ये सुविर्ण त्रिकोण (ॠङ्म’ीिल्ल ळ१ं्रल्लॅ’ी) इकडून होणारी अमली पदाथा्रंचे तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान भारतापुढे आहे. एमडीसारखे भयंकार मादक पदार्थ कायद्याच्या कक्षेत आल्याने व त्याचे मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे येथील साठे उध्वस्त केल्याने २०१७ च्या आॅक्टोबरमध्ये एमडीला पर्याय म्हणून चायना व्हाईटसारखे अति भयंकार मादक द्रव्य भारतातील नार्कोटिक मार्केटमध्ये प्रविष्ट झाले. हे मार्फिक किंवा हेरॉईनपेक्षा १०० पटीने अधिक जालीम आहे. ज्यांच्या हुंगण्यामुळे किंवा केवळ झोप केसिस, खेळझाी, बूट, सौंदर्य प्रसाधनांच्या खोक्यातून चायनाव्हाईट, त्वचेच्या स्पर्शामुळे त्याचा ओव्हडोस झाल्याचा परिणाम होतो. हे म्यानमारमधून भारतात मणीपूर, मिझोराम मागे दिल्लीत अवतरलेले हे द्रव्य ‘हायर दॅन हाय परिणाम देणारे ठरेल. मादक द्रव्यांच्या तस्करीवर दहशतवाद, आंतरराष्टÑीय गुन्हेगारी पासेली जात असल्याने देशाची सुरक्षा व स्वास्थ्यावर विपरीत परिणाम व ताण निर्माण होत आहे. मादक पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापार व यातून देशाच्या महत्त्वाच्या शहरातील त्याचा सुळसुळाट देशाला आतून खिळखिळे बनवू शकतो. यांचे गांभीर्य यंत्रणेबरोबरच देशातील जनतेनेही लक्षात घ्यायला हवे. अन्यथा सीमी सुरक्षा, शस्त्रास्त्र साठा, सैन्यबल इ. सर्व या सुप्त व अदृश्य आक्रमणासमोर निष्प्रभ ठरतील.

टॅग्स :Drugsअमली पदार्थthaneठाणे