Bhiwandi: भिवंडीत इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुखरूप सुटका
By नितीन पंडित | Updated: April 8, 2023 20:37 IST2023-04-08T20:36:35+5:302023-04-08T20:37:08+5:30
Bhiwandi: भिवंडी शहरातील टेमघर पाडा परिसरात असलेल्या अरिहंत सिटी सोसायटी मधील बी विंग इमारतीला शॉकसर्किटने आग लागल्याची घटना शनिवारी घडली.

Bhiwandi: भिवंडीत इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुखरूप सुटका
- नितीन पंडित
भिवंडी - शहरातील टेमघर पाडा परिसरात असलेल्या अरिहंत सिटी सोसायटी मधील बी विंग इमारतीला शॉकसर्किटने आग लागल्याची घटना शनिवारी घडली.इमारतीच्या मागच्या भागात असलेल्या डकला हि आग लागली होती.या आगीमुळे इमारतीत २० ते २५ जण अडकुन पडले होते.महिला व नागरिकांनी मदतीसाठी खिडकी व गॅलरी तसेच टेरेसवरून हाका मारत मदतीसाठी टाहो फोडला होता.आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला होता.भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले असून दाखल अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.