- सदानंद नाईक उल्हासनगर - सीआयएसएफ मधील मेजर अनिल अशोक निकम यांचे दिल्ली येथे ८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ आदी परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी शांतीनगर येथील स्मशानभूमीत शासकीय इंतमात अंत्यसंस्कार झाले. यावेळी सीआयएसएफचे जवान, स्थानिक पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) दिल्ली येथे मेजर अनिल अशोक निकम हे कार्यरत होते. गुरुवारी ८ मे रोजी त्यांचे हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. याबाबतची उल्हासनगर शांतीनगर येथे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाला देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता शांतीनगर येथील स्मशानभूमी मध्ये सीआयएसएफचे जवान, अधिकारी, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्यासह स्थानिक पोलीस, शिवसेना शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. शहीद निकम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण आदिजण आहेत. त्याचे वडिलही सैनिक होते.