शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

उल्हासनगरात २३३ अंध जोडप्यांचा विवाह

By admin | Published: March 28, 2017 5:55 AM

शेकडो अंध, अपंग, निराधारांचे पालकत्व स्वीकारलेल्या अंध हितकारी संस्थेने आतापर्यंत २३३ अंध जोडप्यांची मोफत

सदानंद नाईक / उल्हासनगरशेकडो अंध, अपंग, निराधारांचे पालकत्व स्वीकारलेल्या अंध हितकारी संस्थेने आतापर्यंत २३३ अंध जोडप्यांची मोफत लगं्न लावून त्यांना संसारात बसवले आहे. तसेच त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, म्हणून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.उल्हासनगरातील जगदीश व सुशीला पटेल या दाम्पत्याने घरावर तुळशीपत्र ठेवून अंध, अपंग, वृद्ध, निराधार व विधवांच्या जीवनात आनंद फुलवण्याकरिता वाहून घेतले. त्यांनी ‘अंध हितकारी संस्थे’ची १९७८ साली स्थापना केली. रेल्वे व इतर ठिकाणी भीक मागण्यापेक्षा स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मंत्र पटेल दाम्पत्याने अंधांना देऊन त्यांच्यात जिद्द निर्माण केली. पटेल दाम्पत्याने अंध, अपंग, वृद्ध, निराधार, विधवा महिला यांना देणगीदारांच्या मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. शहरासह राज्यातील विविध भागांतील अंधांची नोंदणी सुरू केली असून संस्थेकडे ७५० पेक्षा जास्त अंधांची नोंदणी झाली. गुरुवार व शनिवार या आठवड्यातील दोन दिवस अपंगांसाठी विशेष भंडाऱ्याचे आयोजन करून त्यांना गोडधोड खाऊ घातले.जगदीश व सुशीला पटेल यांनी अंधांना एकत्र आणून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून दिला. खुर्चीचे विणकाम, राख्या बनवणे, दिवाळीसाठी दिवे व तोरण बनवणे, मेणबत्ती बनवणे आदी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन हाताला काम मिळवून दिले. वर्षातून एकदा चादर, ब्लँकेट, छत्र्यांचे वाटप व चालण्यासाठी लाकडी काठी आदी साहित्याचे मोफत वाटप केले जाते. अंध जोडप्यांची मोफत लग्नं लावून देत असून संसारोपयोगी भांड्यांसह तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या पायल दिल्या जातात. तसेच लिहिण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपी शिकवली जाते. त्यांच्यासाठी विशेष वाचनालय पटेल दाम्पत्याने सुरू केले आहे. अंधांमधील कलागुण हेरून गायक, तबलावादक अशा कलांना प्रोत्साहन देत आॅर्केस्ट्रा पथक स्थापन केले. महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांच्या आॅर्केस्ट्राचे शो होतात. संस्थेने त्यांच्या हाताला काम मिळाले, नाहीतर त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून १०० गरीब व गरजूंना दर आठवड्याला बोलवून अन्नधान्याचे मोफत वाटप केले जाते.