शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ketaki Chitale : केतकी चितळेला शरद पवारांवरील फेसबुक पोस्ट प्रकरणी जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:34 IST

Ketaki Chitale : ठाणे सत्र न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी दिलासा मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला आहे. २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, आता तिची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळेलाशरद पवारांवरीलफेसबुक पोस्ट प्रकरणी अखेर जामीन मंजूर झाला आहे. बुधवारी केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. यापूर्वीही तिला ठाणे सत्र न्यायालयानं अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे,’ असा दावा केतकीने याचिकेद्वारे केला होता. ‘कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता मला अटक करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवावी, अशी मागणी केतकीने याचिकेद्वारे केली होती. केतकीला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी तिला सीआरपीसी ४१(ए)अंतर्गत नोटीस देऊन चौकशी अधिकाऱ्यांपुढे उपस्थित राहण्यास सांगायला हवे होते, असा युक्तिवाद केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी न्यायालयात केला होता. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेSharad Pawarशरद पवारFacebookफेसबुक