आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला
By प्रशांत माने | Updated: December 29, 2023 15:06 IST2023-12-29T15:05:10+5:302023-12-29T15:06:39+5:30
Maratha Reservation: आपण या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावे, आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहेच असा सल्ला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला
- प्रशांत माने
डोंबिवली - आपण या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावे, आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहेच असा सल्ला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
पश्चिमेकडील उमेशनगरमध्ये मनसेच्या वतीने भव्य आगरी कोकणी महोत्सव ‘जत्रा’ २०२३ चे आयोजन केले आहे. गुरूवारी आमदार पाटील यांनी येथे भेट दिली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुदयावर उपोषण करण्यासाठी २० जानेवारीला मुंबईत दाखल होत आहेत. याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले मराठा आरक्षणाचा विषय सोपा नाही. कारण कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इमपेरिकल डाटा जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून संख्या घ्यावी लागेल, या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार आहे. सरकारने जेव्हा जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हाच वस्तुस्थिती सांगायला हवी होती. तर ही वेळ आली नसती याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.