शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आम्ही आंबा 'चोपून' खाल्ला; ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 15:43 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे. 

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे. कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार यांनी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला होता. आंबा कापून खायचा की चोखून खायचा? यावर आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा चिमटा भाजपाला काढला आहे. ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेती उत्पादन राज्य सरकारने शहरात स्टॉल स्थापन करून विकण्याची परवानगी दिली आहे. भाजीपाला विकू शकतात मग आंब्यानं काय घोडं मारलं होतं? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जर शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर त्यांना विकू देत नाही. भाजीपाला विकू देत,भलं शेतकऱ्यांचं होतंय, मग यात पक्षीय राजकारण कसलं आणताय असंही राज यांनी सांगितले. 

ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजप वाद सुरूच

आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरुन सोशल मिडीयावर मनसे-भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे. एका मराठी शेतकऱ्याला विरोध करणारा भाजप हा त्याच ठिकाणी फुटपाथवर असलेल्या परप्रांतीय आंबे विक्रेत्याला विरोध का करीत नाही, असा सवाल मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रविवारी फेसबुकवर लाईव्ह करत विचारला होता. 

ठाण्यात आंबा स्टॉलवर कारवाई करावी यासाठी भाजपाच्या नगरसेवकाकडून महापालिकेत तक्रार करण्यात आली. त्यानंतर हा स्टॉल हटविण्याला मनसेने विरोध केला. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमला नाही शेवटी या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं अखेर पोलिसांना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. दरम्यान मनसेने आंबा स्टॉल हटविण्याचा विरोध करत शेतकऱ्यांसाठी १७ मे रोजी मोर्चा काढण्याचे मनसेने जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेने आयोजित केलेल्या शेतकरी मोर्चामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापू लागणार हे नक्की 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेthaneठाणेBJPभाजपा