साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:40+5:302021-04-07T04:41:40+5:30

ठाणे : इंदिरानगर येथील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या पिंटू कचरू घुले (४०, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या चोरट्यास ...

Man arrested for trying to steal donation box from Sai Baba temple | साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रंगेहाथ अटक

साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रंगेहाथ अटक

googlenewsNext

ठाणे : इंदिरानगर येथील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या पिंटू कचरू घुले (४०, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या चोरट्यास दक्ष नागरिकामुळे रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला वागळे इस्टेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

इंदिरानगर येथील एक रहिवासी उल्हास पाटील हे आपल्या सातारा येथील गावी गेले होते. ते ६ एप्रिल रोजी पहाटे २.२० वाजेच्या सुमारास नितीन कंपनी येथे एका खासगी बसने उतरले. ते आंबेवाडी भाजीमार्केटजवळील पोलीस चौकीजवळून जात असताना पिंटू हा आकाश बारच्या मागे असलेल्या आंबेवाडी भाजी मार्केटसमोरील इंदिरानगर येथील साईबाबा मंदिराची ग्रिलची खिडकी तोडून आत शिरकाव करून दानपेटी उचलून ती चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याच भागातून गस्तीवर जात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक निकुंभ यांच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. नंतर त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्याला पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अटक केली. पोलीस नाईक आर.सी. शेलार हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Man arrested for trying to steal donation box from Sai Baba temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.