ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 00:23 IST2020-10-14T00:17:04+5:302020-10-14T00:23:38+5:30
इंदिरानगर भागातील एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया भरत शाहूद (२४) या बिगारी कामगाराला श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. विनयभंग तसेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विनयभंग तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वागळे इस्टेट, इंदिरानगर भागातील एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया भरत शाहूद (२४, रा. इंदिरानगर, ठाणे) या बिगारी कामगाराला श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ही मुलगी ९ आॅक्टोबर रोजी तिच्या घरी असतांना भरतने तिच्या बहिणीसमोर तिच्याशी लगट करीत तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिथून पलायन केले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात ९ आॅक्टोबर रोजी विनयभंग तसेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजना बनसोडे यांच्या पथकाने आरोपी भरत याला १० आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याला सुुरुवातीला पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.