शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यास अटक: एक काेटी ४७ लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: January 30, 2026 21:25 IST

ट्रकमध्ये 'ऑटोमोबाईल पार्टस'च्या नावाखाली सुरू होती तस्करी: राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई

- जितेंद्र कालेकर लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने नाशिक-मुंबई हायवेवर एका मोठ्या कारवाईत बनावट परराज्यातील बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या ट्रकचालक श्रवणकुमार कृष्णराम पंवार (वय २९, रा. जालौर, राजस्थान) याला अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी शुक्रवारी दिली. त्याच्या ताब्यातून एक काेटी ४७ लाखांच्या मद्यासह एक कोटी ७२ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नाशिक-मुंबई हायवेवरून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या काेकण विभागीय भरारी पथकाचेनिरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्याच आधारे उपआयुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जानेवारी २०२६ रोजी नाशिक-मुंबई महामार्गावरील सोनाळेगाव येथील एच. पी. पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून सहाचाकी ट्रकमधून तस्करी करणाऱ्या श्रवणकुमार याला अटक केली.

ऑटोमोबाईल पार्टसचा बनाव फसला-भरारी पथकाने ट्रकचालकाकडे केलेल्या चाैकशीमध्ये ट्रकमध्ये 'ऑटोमोबाईल पार्टस' असल्याचे गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. संशय बळावल्याने ट्रकची सखोल तपासणी केली. ट्रकचा मागील दरवाजा उघडला असता, आत खाकी रंगाचे अनेक बॉक्स आढळून आले. ते उघडल्यानंतर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मिती असलेल्या नामांकित ब्रँडचे १८० मिली क्षमतेच्या एकूण ६७,२०० बाटल्याचे १४०० बॉक्स सापडले. या मद्यसाठ्यावर कोणताही बॅच नंबर किंवा किंमतीचा उल्लेख नव्हता.

या कारवाईत पथकाने एक काेटी ४७ लाखांचे मद्य, २५ लाखांचा ट्रक आणि दहा हजारांचा माेबाईल असा एक काेटी ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी ट्रकचालक श्रवणकुमार याच्याविरुद्ध त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक रिकेश दांगट, व्हि. व्हि. सकपाळ, एच. बी. यादव, सहायक दुय्यम निरीक्षक महाबोर कोळेकर आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi: Fake Liquor Smuggler Arrested; Goa-Made Liquor Worth ₹1.47 Crore Seized

Web Summary : A truck driver was arrested in Bhiwandi for smuggling fake Goa-made liquor worth ₹1.47 crore. Authorities seized the liquor, a truck, and a mobile phone, totaling ₹1.72 crore. The driver attempted to conceal the liquor as automobile parts. An investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी