अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक, नौपाड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:55 IST2026-04-07T18:55:27+5:302026-04-07T18:55:38+5:30

आराेपीला फाशी देण्याची मागणी!

Man arrested for sexually assaulting minor girl, incident in Naupada | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक, नौपाड्यातील घटना

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक, नौपाड्यातील घटना

ठाणे : एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रामलड्डू यादव (वय ४५) या आराेपीला अटक केल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी मंगळवारी दिली. त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिंदेसेनेने केली आहे.

नाैपाडा भागातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ६ एप्रिल राेजी सायंकाळी पावणेआठ ते सव्वाआठच्या दरम्यान यादव याने त्याच भागात राहणाऱ्या या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करणारा आराेपी हा पीडितेच्या वडिलांच्या ओळखीतील असल्याने तिने आपल्यावर अत्याचार करणाऱ्याची तिच्या वडिलांना माहिती दिली.

त्याच भागात मजुरी करणाऱ्या या पित्याने नाैपाडा पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेक्साे कायद्याखाली ७ एप्रिल गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक रवींद्र रणभिसे यांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच आराेपीला अटक केली.
दरम्यान, आराेपी यादव हा त्याच भागातील बांधकामाच्या साईटवर मजुरीचे काम करीत असून, त्याला फाशी देण्याची मागणी शिंदेसेनेचे नाैपाडा विभागप्रमुख किरण नाक्ती, संगम डाेंगरे आदींनी केली आहे.

Web Title : नाबालिग लड़की से यौन उत्पीड़न: नौपाड़ा में आरोपी गिरफ्तार

Web Summary : नौपाड़ा में सात वर्षीय लड़की के साथ यौन उत्पीड़न के आरोप में 45 वर्षीय रामलड्डू यादव को गिरफ्तार किया गया। घटना 6 अप्रैल को एक निर्माणाधीन स्थल पर हुई। पीड़िता के पिता की शिकायत के बाद पुलिस ने तुरंत आरोपी को पकड़ लिया। शिवसेना ने आरोपी को फांसी देने की मांग की है।

Web Title : Minor Girl Sexually Assaulted: Accused Arrested in Naupada

Web Summary : A 45-year-old man, Ramladdoo Yadav, was arrested in Naupada for sexually assaulting a seven-year-old girl. The incident occurred on April 6th at a construction site. Police swiftly apprehended the suspect following a complaint filed by the victim's father. Shiv Sena demands the accused face the death penalty.