अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक; वागळे इस्टेट पाेलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:04 IST2025-09-03T18:59:36+5:302025-09-03T19:04:26+5:30
मुलीच्या बहिणीने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा करुन आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्याला पेालिसांच्या स्वाधीन केले.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक; वागळे इस्टेट पाेलिसांची कारवाई
ठाणे: एका दहा वर्षाच्या मुलीशी लगट करीत तिचा विनयभंग करणाऱ्या जितू सखाराम पवार (४०) या आराेपीला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पेालिसांनी बुधवारी दिली. मुलीच्या बहिणीने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा करुन आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्याला पेालिसांच्या स्वाधीन केले.
ठाण्यातील वागळे इस्टेट, काजूवाडीमध्ये पिडित मुलगी एकटीच घरी असतांना त्याच भागात राहणाऱ्या आराेपीने तिच्या घरात २ सप्टेंबर राेजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिरकाव करुन तिचा विनयभंग केला. चप्पल आणण्यासाठी गेलेली तिची माेठी बहिण त्याचवेळी घरी परतली तेंव्हा तिने आपल्या बहिणीचा आवाज ऐकला. तिने आजूबाजूच्या लाेकांना बाेलवून हा प्रकार सांगितला. वागळे इस्टेट पाेलीस ठाण्यात याप्रकरणी पाेस्काेसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पेालीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या पथकाने आराेपीला अटक केली.