शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अवैध दारूविरुद्धच्या कारवाईने महेश पाटील यांची ठाण्यातील कारकीर्द गाजली

By जितेंद्र कालेकर | Updated: August 1, 2018 23:03 IST

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची गेल्या दोन वर्षांतील कारकीर्द चांगलीच गाजली. अवैध दारुविरुद्ध सुरु केलेली व्यापक मोहीम, भाजपाचे नगरसेवक यांच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्हयातील कारवाई, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या खूनाचा छ डा अशा अनेकविध कारणांनी त्यांनी आपला ग्रामीण अधीक्षकपदी ठसा उमटविला.

ठळक मुद्देग्रामीण अधीक्षकपदी उमटला ठसागुन्हेगारीस बसला चापपारदर्शक गतिमान पोलीस सेवेसाठी आॅनलाइन तक्रार सुविधा

जितेंद्र कालेकरठाणे : अवैध दारूविरुद्ध संपूर्ण ठाणे ग्रामीण भागात पोलिसांनी सुरू केलेली कारवाईची मोहीम, या व्यवसायातील अनेकांचे केलेले पुनर्वसन, मीरा रोड भागात अनेक कुख्यात सोनसाखळी चोरट्यांवर केलेली कारवाई आणि दहशत माजवणाºयांवर मोक्कांतर्गत कारवाई केल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची कारकीर्द चांगलीच गाजली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पाटील यांची बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले.पाटील यांनी १६ मे २०१६ रोजी ठाणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची सूत्रे घेतली होती. गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच त्यांनी अवैध गावठी दारूविरुद्ध व्यापक मोहीम उघडली. यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये मीरा रोड, भार्इंदर, गणेशपुरी, शहापूर आणि मुरबाड या उपविभागांतील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दोन हजार ७३९ अवैध मद्यविक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी ७६ लाख सहा हजार ४१६ रुपयांचा माल जप्त केला. अनेक दारूविक्रेत्यांना अन्य व्यवसाय स्थापन करण्यास मदत करून त्यांचे पुनर्वसनही केले. पोलिसांच्या या व्यापक मोहिमेमुळे जिल्ह्यातील सुमारे ३७१ ग्रामपंचायतींनी गावात गावठी दारू बंद झाल्याचा ठरावही केला. अशा अवैध दारूविक्रीवर पोलिसांच्या मदतीसाठी ३९४ ग्रामरक्षकांचीही निर्मिती केली.* आठ हजार नागरिकांचा मुद्देमाल केला परतचोरी तसेच दरोड्यातील मुद्देमाल हस्तांतरणासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला. सुमारे आठ हजार नागरिकांचा मुद्देमाल परत करण्यात पोलिसांना यश आले. पारदर्शक गतिमान पोलीससेवेसाठी आॅनलाइन तक्रार सुविधा तसेच अर्ज चौकशीमध्येही गती आणली. प्रलंबित अर्जांचे प्रमाण १० हजारांवरून दीड हजारापर्यंत आणले. पासपोर्टच्या पडताळणीमध्येही सुसूत्रता आणल्यामुळे नागरिक पोलीस ठाण्यात येण्याऐवजी पोलीस नागरिकांच्या घरी जाऊन टॅबच्या मदतीने पडताळणी करतात. अमली पदार्थविरोधी मोहीमही व्यापकपणे राबवून तरुणतरुणींमध्ये पोलिसांनी जनजागृती केली.गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तीन टक्कयांनी वाढलेचोरी, दरोडे, फसवणूक, लैंगिक अत्याचार असे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ६९ वरून ७२ टक्के आणले. नगरसेवक महेश पाटील खंडणी प्रकरण, व्यापा-याला खंडणीसाठी ओलीस ठेवणारा दीपक वैरागड या पोलीस कर्मचा-यासह दोघांची अटक, शहापुरातील शिवसैनिकाच्या हत्येचा उलगडा आणि अंबरनाथ येथे तरुणावर गोळीबार करून त्याच्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक हे महत्त्वाचे गुन्हे आपल्या कार्यकाळात उघड करण्यात यश आल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

* पोलीस कर्मचा-यांसाठी गृहसंकुल योजनामीरा-भार्इंदर महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषद या दोन महत्त्वाच्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. याशिवाय, समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध असतानाही ती मोजणीप्रक्रिया यशस्वीपणे हाताळली. या दोन वर्षांच्या काळात पोलीस कर्मचा-यांसाठीही टिटवाळ्यात गृहसंकुलाची योजना कार्यान्वित केली. नागरिकांना आपल्या कामातून न्याय देऊ शकलो, याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली