शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

महाराष्ट्र निवडणूक निकाल : एकनाथ शिंदेंनी साधली विजयाची हॅटट्रिक, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघावर फडकविला भगवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 16:07 IST

Maharashtra Vidhan Sabha Result : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे.

ठाणे - कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांमध्ये आघाडी घेत आपला गड कायम राखला आहे. शिंदे यांनी 1 लाख 13 हजार 4 मते मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी निकाल लागल्यामुळे पुन्हा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघावर भगवा फडकविला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे संजय घाडीगावकर आणि मनसेचे महेश कदम यानी शिंदे यांना आव्हान दिले होते. हे त्यात घाडीगावकर यांनी प्रचारात क्लस्टरचा मुद्दा घेऊन शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

ओवळा माजीवडा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना 1,17, 289 मतदारांनी मतांच्या रुपात मतदान केले. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा 83,772 मतांनी पराभव करत, विजयाची हॅटट्रिक साधली. सुरुवातीपासूनच सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत, त्यांनी आपला गड राखला. या विजेयाचे श्रेय त्यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांना दिले.

विधानसभा निवडणुकाचा कल जवळपास हाती आलेला आहे. भाजपाच्या चौफेर उधळलेल्या वारूला जनतेनं लगाम घातला असून, त्यांची घोडदौड 100 जागांच्या आसपास थांबण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक नेत्यांची मेगा भरती सुरू होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि उमेदवार सेना-भाजपानं फोडून स्वतःच्या पक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सेना-भाजपानं आयात केलेल्या एकूण 35 आयारामांपैकी 19 जणांचा पराभव झालेला आहे. त्यातील शिवसेनेचे 11 आणि भाजपाच्या 8 आयाराम उमेदवारांचा समावेश आहे. या निकालानंतर शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाची अब की बार 220 पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणेpratap sarnaikप्रताप सरनाईक