शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम, पूर्वेत शिवसेनेची बंडाळी, भाजपविरोधात शिवसेनेच्या बंडखोरांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 02:05 IST

कल्याण पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या इच्छुकांकडून प्रबळ दावा केला जात असताना, रविवारी सायंकाळी हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जात असल्याचे कळताच शिवसेनेच्या इच्छुकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

कल्याण : कल्याण पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या इच्छुकांकडून प्रबळ दावा केला जात असताना, रविवारी सायंकाळी हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जात असल्याचे कळताच शिवसेनेच्या इच्छुकांनी आक्रमक पवित्रा घेतला. इच्छुकांच्या मागणीशी सहमत होत सेनेच्या कल्याण शहर प्रमुखांनी दोन्ही मतदारसंघातून भाजपविरोधात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. ही कृती पक्षाच्या नव्हे तर, भाजपविरोधात आहे. कल्याणमध्ये पक्षहितासाठी हे पाऊल उचलत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिवसेनेची ही बंडाळी भाजपला आव्हान देणारी ठरते की, नेत्यांकडून हे बंड शमवले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहर शाखेत रविवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत भूमिका जाहिर केली. कल्याण पश्चिमेतून शिवसेनेचे इच्छूक उमेदवार माजी महापौर राजेंद्र देवळेकर, अरविंद मोरे, रवि पाटील, श्रेयस समेळ, मयूर पाटील, साईनाथ तारे हे उपस्थित होते. शहर प्रमुख भोईर हेदेखील कल्याण पश्चिमेतून इच्छूक आहेत. याशिवाय कल्याण पूर्वेतून इच्छूक असलेले रमेश जाधव, महेश जाधव हे यावेळी उपस्थित होते.विश्वनाथ भोईर यावेळी म्हणाले की, कल्याण पश्चिमेला शिवसेनेचे २०, तर भाजपचे सहा नगरसेवक आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे नरेंद्र पवार हे मोदी लाटेत निवडून आले होते. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून शिवसेना कल्याण पश्चीम मतदारसंघावर दावा करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही नुकतीच भेट घेऊन हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्या मागणी केली होती.रविवारी शिवसेनेच्या उमेदवारांना मुंबईत एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. यावेळी कल्याण पश्चीम आणि पूर्वेतील पक्षाच्या इच्छुकांना एबी फॉर्म देण्यासाठी बोलावणे आले नाही. त्यामुळे पुढील अंदाज घेऊन शिवसेनेकडून भाजपविरोधात बंडाळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतून ११ इच्छूक उमेदवार आहे. त्यापैकी एका उमेदवाराला भाजपविरोधात निवडणूक लढवण्यासाठी उभे केले जाईल. त्याच धर्तीवर कल्याण पूर्वेत शिवसेनेतर्फे पाच उमेदवार इच्छूक आहे. त्यापैकी एका उमेदवाराला भाजपविरोधात एकमताने उभे केले जाईल, असे भोईर यांनी स्पष्ट केले आहे.शिवसेनेचे प्राबल्य असताना या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी भाजपविरोधात उमेदवार दिला जाईल. ही पक्ष्विरोधात बंडाळी नसून भाजपविरोधात उपसलेले हत्यार असल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. ही मैत्रीपूर्ण लढतही असू शकते, असे स्पष्ट करतानाच, विद्यमान भाजप आमदाराने निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे. २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कल्याण पश्चिम व पूर्व विधानसभा भाजपला दिल्यास त्याचे परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यताही इच्छुकांनी व्यक्त केली.शिवसेनेच्या इच्छुकांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवावा. त्यांनी युतीचा विचार करुनच निर्णय घेतला असेल. युतीच्या उमेदवाराचे शिवसेनेच्या इच्छुकांनी काम केले पाहिजे. पक्षश्रेष्ठी यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असे भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत बोलताना सांगितले. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड हे एका कार्यक्रमात असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.युती झालेली आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा कायम आहे. कल्याण, नवी मुंबई आणि अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या जागांवरुन बोलणी अडलेली आहे. जागा वाटप जाहीर झालेले नसताना, आधीच इच्छुकांनी अशी भूमिका घेणे योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केली. लांडगे हेदेखील कल्याण पूर्वेतून शिवसेनेचे प्रबळ दावेदार आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019