शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Vidhan Sabha 2019: शिवसेनेचे काही आमदार फुटण्याची शक्यता; पक्षाच्याच सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:48 IST

नेतृत्त्वासमोर विद्यमान आमदारांना फुटण्यापासून रोखण्याचे आव्हान

- अजित मांडके ठाणे : नवरात्रीत शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत फैसला होणार आहे. परंतु, युती झाली किंवा नाही झाली तरी ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी गेल्या नऊ महिन्यांपूर्वीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे, त्या ठिकाणी शिवसेनेतील संभाव्य उमेदवारांची निश्चिती झाली आहे.भाजपवर कुरघोडी करण्यासाठी ठाण्यात शिवसेना सिद्ध आहे. युती तुटली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्याच सर्वेक्षणातून उघड झाली आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाची तयारी तर दुसरीकडे विद्यमान आमदारांना फुटण्यापासून रोखण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फार्म्युला निश्चित झालेला नाही. त्यात काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास ठाणे शहर विधानसभा क्षेत्र मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, युती तुटलीच तर या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल ती नावे अंतिम झाल्याची माहिती आहे. युती झाली तरीही ही जागा मिळावी यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असून त्या बदल्यात दोन वर्षांनी होणाऱ्या विधानपरिषदेची जागा सोडण्यास पक्ष तयार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपने ठाणे शहरची जागा सोडल्यास विद्यमान आमदार संजय केळकर यांचे विधानपरिषदेवर पुनर्वसन केले जाऊ शकते, असे सेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.मागील वेळेस शिवसेना गाफील राहिल्याने, शिवसेनेला ऐन वेळेस स्वबळावर निवडणूक लढवून उमेदवारांची शोधाशोध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत पक्षातील प्रत्येक उच्चपदस्थ नेत्यांबरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही गाफील न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मागील नऊ महिन्यांपासूनच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु आहे. यासाठी काहींचा प्रवेशही लांबणीवर टाकला आहे. युती तुटली तर अशांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी देण्याची तयारीही जिल्ह्यातील काही मतदारसंघात सुरु आहे.शिवाय काही इच्छुकांना आधीपासूनच तयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील काही मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेकडून अंतिम झाले आहेत. परंतु, युती तुटली तरच त्यांची नावे घोषित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या ठिकाणी जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा आहे, त्याठिकाणी कुरघोडीचे राजकारण खेळण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. ठाण्यासह जिल्ह्यातील अशा काही मतदारसंघांत त्याचे पडसादही मागील काही महिन्यांत उमटल्याचे दिसून आले.संभाव्य फुटीमुळे पक्षश्रेष्ठी सावधयुती तुटली तर स्वबळाची तयारी शिवसेनेने केली असली तरी त्यांच्याच पक्षातील काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यताही त्यांना सतावत आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार आहेत, तर भाजपचे सात आणि एक अपक्ष असे आठ आमदार आहेत. त्यात युती तुटली तर शिवसेनेचे दोन आमदार वेगळा घरोबा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या दोघांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे पटत नाही. मात्र जर ते फुटून भाजपातून निवडून आले तर शिवसेनेचा जिल्ह्यावरील वरचष्मा कमी होऊन भाजपचे जिल्ह्यात १० आणि शिवसेनेचे चार आमदार निवडून येण्याची चिंता पक्षाला सतावत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना