Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:21 IST2019-09-26T00:21:01+5:302019-09-26T00:21:29+5:30
सर्व इच्छुक उमेदवार आले एकत्र; राष्ट्रवादीला मतदारसंघ देण्यास विरोध

Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ
ठाणे : ठाणे शहर मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. तो राष्टÑवादीकडे जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेसच्या ११ ते १२ इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे. या उमेदवारांनी एकत्र येऊन बुधवारी पत्रकार परिषदेत एकीचे बळ दाखवले. मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईतील राष्टÑवादीची ताकद आता माजी मंत्री गणेश नाईक यांच्यामुळे कमी झाल्याने ते मतदारसंघ काँग्रेसच्या माथी मारून राष्टÑवादीने कळवा-मुंब्रा मतदारसंघाप्रमाणे सहज व सोपे असे जिंकता येतील, असे मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला आमचा विरोध असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच, महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्टÑवादी मित्रपक्षाच्या जागावाटपासंदर्भात धोरणही निश्चित झाले आहे. सध्या ठाणे शहर मतदारसंघ काँग्रेसऐवजी राष्टÑवादीकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसमधून या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांना याबाबत पूर्वसूचना देऊन ठाणे शहर मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यासाठी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद बोलवली. यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उमेदवार सचिन शिंदे, संदीप शिंदे, राहुल पिंगळे, परेश कोळी, अनिस कुरेशी, सोनलक्ष्मी घाग, बजरंग यादव आदी उपस्थित होते.