Video: ठाण्यात राडा! संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला वाहिलेली शाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकली, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:03 IST2025-03-03T11:01:39+5:302025-03-03T11:03:32+5:30
Thane Thackeray VS Shinde Sena Rada: खासदार संजय राऊत यांनी काल ठाण्यात आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पण, यावेळी शिवसेनेतील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

Video: ठाण्यात राडा! संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला वाहिलेली शाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकली, अन्...
Thane Shivsena Rada ( Marathi News ) : काल ठाण्यात शिवसेनेतील दोन्ही गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी पुतळ्याला वाहिलेली शाल आणि हार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकून दिली. कार्यकर्त्यांनी राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा
काल ठाण्यात ठाकरे गटाच्यावतीन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याआधी खासदार संजय राऊत यांनी टेंभीनाका येथील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हार आणि शाल रस्त्यावर फेकून दिली. यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी खासदार संजय राऊत यांना जाण्यास वाट मोकळी करुन दिली.
संजय राऊतांची टीका
ठाण्यातील राड्यानंतर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले, आनंद दिघे तुमची खासगी प्रॉपर्टी आहेत का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे कुणाची खासगी मालमत्ता नाहीत. आम्ही दिघे यांच्या पुतळ्याला हार घातल्यामुळे १०० रेडे कापून यांना आता दुग्धाभिषेक करण्याची वेळ आली आहे. पण, हे दूध कोणत्या रेड्याचं होतं, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.