शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

Maharashtra Government: राज्याच्या राजकारणात ठाणे केंद्रस्थानी, सेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईकांवर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:40 IST

सत्तास्थापनेसाठी शनिवारी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांभोवती प्रत्येक पक्षाने संरक्षक कठडे उभारले आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे : सत्तास्थापनेसाठी शनिवारी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांभोवती प्रत्येक पक्षाने संरक्षक कठडे उभारले आहे. मुंबईतील खासगी हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना ठेवले असून, शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शिवसेनेच्या आमदारांची, तर राष्ट्रवादीच्या आमदारांची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही माजी पालकमंत्री गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील आमदारांची जबाबदारी सोपविल्याने ठाणे जिल्हा सतेच्या केंद्रस्थानी असल्याचे चित्र दिसत आहे.शिवसेनेने याआधीच माजी पालकमंत्री तथा कोपरी-पाचपाखाडीतील शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीने सोडला, तर शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील सत्ता समीकरणात शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवण्याची, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटू नयेत, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शिंदे यांच्याकडेच आहे. शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकहाती पकड आहे. जिल्ह्यात कल्याण ग्रामीण आणि शहापूर या दोन जागा वगळता शिवसेनेने लढवलेल्या सर्व पाच जागा जिंकल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांची महापौरपदी बिनविरोध निवड होण्यात आणि उल्हासनगरातही सत्तांतर घडवून महापौरपदी लीलाबाई अशान या विराजमान होण्यात शिंदे यांचेच डावपेच यशस्वी ठरले. याशिवाय, अहमदनगरसारख्या ठिकाणीही शिंदेशाहीची नीती यशस्वी ठरल्याने ते ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची साथ सोडून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी फडणवीस यांच्या जोडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, अशाही स्थितीत मोठ्या साहेबांची साथ न सोडणाऱ्या जयंत पाटील यांच्यासह ठाण्यातील कळवा, मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचेही नाव घेतले जाते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासूनच आव्हाड हे त्यांच्याबरोबर आहेत. म्हणूनच पक्षाचे आमदार एकजुटीने राहावेत, याची खबरदारी घेण्यापासून अनेक महत्त्वाच्या जबाबदाºया ते सांभाळताना दिसत आहेत.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे ८, शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे दोन, तर मनसे, सपा आणि अपक्ष मिळून प्रत्येकी एक आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास ठाण्यातील शिलेदारांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक मुख्य भूमिकेतविधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात दोन जागा अतिरिक्त घेऊन आठ जागा जिंकल्यामुळे भाजपची सरशी झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतून जिल्हाभर भाजपची मोट सांभाळणारे रवींद्र चव्हाण तसेच निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईकांवरही भाजप नेतृत्वाने आपल्या आमदारांची जबाबदारी सोपविली आहे. आपले आमदार फुटू नये, कोणतीही दगाबाजी होऊ नये, यासाठी शिवसेना राष्टÑवादीप्रमाणेच भाजपचेही चव्हाण आणि नाईक हे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा