Maharashtra Election 2019:Dissolve the bone and vote for it | Maharashtra Election 2019:अस्थी विसर्जन करून मतदानाचा हक्क बजावला
Maharashtra Election 2019:अस्थी विसर्जन करून मतदानाचा हक्क बजावला

बदलापूर : बदलापूर, वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचे १९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या अस्थीचे विसर्जन करून लागलीच म्हात्रे कुटुंबातील ५२ जणांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावला.

बदलापूर, वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचे दोन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अस्थींचे सोमवारी सकाळी विसर्जन करून लागलीच म्हात्रे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपला मतदानाचा हक्क बजावला.

बदलापूर शहरात विक्रमी मतदानासाठी राजकीय पक्ष आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश येत असल्याचे वडवली भागात दिसले. म्हात्रे यांची मुले आणि पुतणे यांच्याबरोबरच घरातील महिलांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. म्हात्रे कुटुंबाने मतदानाला दिलेले हे महत्त्व हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. मतदारांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी त्यांचे फोटो सर्वत्र शेअर केले जात होते.


Web Title: Maharashtra Election 2019:Dissolve the bone and vote for it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.