शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, प्रताप सरनाईकांनी साधला मेहतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:11 IST

शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

मीरा रोड - शिवसेना सर्वात विश्वास घातकी पक्ष असून मीरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पण शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना संदेश पाठवून मेहतांनी माफी मागितली. भावनेच्या भरात व मानसिक तणावात आपण बोलून गेल्याचे मेहतांनी फोन करून सांगितले, असे खुद्द सरनाईक यांनी म्हटले आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, शिवसेना संपवण्याची भाषा करणारे स्वत:च संपले, असे सरनाईक शिवसैनिकांना म्हणाले आहेत.बाळासाहेब ठाकरे कलादालनास विरोध, मेहतांनी उद्धव ठाकरे व शिवसैनिकांचे काढलेले संस्कार आदी कारणांसह सेना नगरसेवक, पदाधिकारी आदीमध्ये विविध कारणांनी मेहतांबद्दल असलेल्या रोषामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी मेहतांना ठरवून धोबीपछाड दिला. त्यामुळे मेहता खवळले असून त्यांनी थेट सेनेला सर्वात मोठी विश्वास घातकी पार्टी म्हणत शहरातून शिवसेना मुळासकट संपवणार, असा दम भरला होता.मेहतांच्या वक्तव्याने सोशल मीडियासह शिवसैनिकांमध्ये निषेध आणि संताप व्यक्त होत होता. नगरसेवक राजू भोईर यांनी तर शिवसेनेला संपवण्याची भाषा करणा-यांना मीरा भाईंदरच्या जागरुक जनतेने आधीच संपवून टाकले आहे. शिवसैनिकांना डिवचणा-यांचे काय होते हे महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. स्वत:ची खोटी कर्म आणि केलेली पापं याचं प्रायश्चित करा, असा टोला भोईर यांनी लगावला आहे.मेहतांवर शिवसैनिक संतापले असल्याने सरनाईकांनीच समजूत काढली आणि शांत राहण्यास सांगितले. लोकांनीच ज्याला संपवले त्याला नाहक मोठं करू नका, असे सांगतानाच २०२२ पर्यंत मेहतांचं राजकिय अस्तित्व जनता आणि शिवसेना ठेवणार नाही, असे सरनाईक म्हणाले. भले भले शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपले. कुत्र्यासारखे हाल झाले. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, अशी बोचरी टीका त्यांनी केली. मेहतांनीच आपल्या संदेश पाठवून माफी मागितली असून, भावनेच्या भरात बोललो, असे म्हटल्याचे सरनाईकांनी सांगितले. मेहतांनी फोन देखील केला असे ते बोलले.खासदार राजन विचारे यांनी देखील मेहतांचा समाचार घेत शिवसेना संपवण्याची भाषा करण्याची देखील मेहतांची पात्रता नाही असे म्हणाले. लोकांनी तुमची पात्रता दाखवुन दिली असुन स्वत:च्या कर्माचे खापर दुसरायांवर फोडण्या पेक्षा आत्मचिंतन करुन सुधरा असा सल्ला विचारेंनी दिलाय.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019