Maharashtra Election 2019 : ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 02:28 IST2019-10-08T02:28:31+5:302019-10-08T02:28:48+5:30
अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते.

Maharashtra Election 2019 : ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात
ठाणे : जिल्ह्यातील १८ मतदारसंघांच्या निवडणूक रिंगणात २१३ उमेदवार निश्चित झाले आहेत. ३८ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मीरा- भार्इंदर अशा प्रमुख लढतींमधील बंडोबांना थंड करण्यात दिग्गज नेत्यांनाही अपयश आले आहे.
अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते. यातील ३८ जणांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता १८ मतदारसंघांमध्ये २१३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि भिवंडी पश्चिममध्ये प्रत्येकी सात उमेदवार आहेत. भिवंडी पूर्वला १४, कल्याण पश्चिमला १७, मुरबाडला सात, अंबरनाथला १७, उल्हासनगरला १८, डोंबिवलीत सहा, तर कल्याण ग्रामीण, मीरा-भार्इंदर या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी १२ उमेदवार आहेत. ओवळा-माजिवडा येथे १४ तर, ठाणे शहर विधानसभेमध्ये पाच उमेदवार आहेत. कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा आणि ऐरोली मतदारसंघात प्रत्येकी ११ उमेदवार आहेत. बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सर्वात कमी/जास्त उमेदवार
ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी ५ उमेदवार ठाणे शहर मतदारसंघात आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २० उमेदवार आहेत.